GT vs SRH: सनरायझर्स हैदराबादचं 16 गुणांचं गणित लांबलं, पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 56व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्सने 168 धावांचं सोपं आव्हान ठेवलं होतं. पण सनरायझर्स हैदराबादला काही गाठता आलं नाही.

GT vs SRH: सनरायझर्स हैदराबादचं 16 गुणांचं गणित लांबलं, पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला...
GT vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा 16 गुणांचं गणित लांबलं, पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 12, 2026 | 11:04 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 56व्या सामन्यात सनरायझर्सचा हैदराबादचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय चुकला असं निकालानंतर म्हणावं लागेल. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि गुजरात टायटन्सला 168 धावांवर रोखलं. खरं तर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाज आणि त्यांचा क्रम पाहता हे आव्हान सुरूवातीला सोपं वाटलं. पण गुजरात टायटन्सने भेदक मारा केला आणि सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही. त्यामुळे पराभव निश्चित होत गेला. या पराभवानंतर सनरायझर्सची घसरण दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झाली. तर गुजरात टायटन्सने 16 गुणांसह पहिलं स्थान गाठलं आहे. गुजरात टायटन्स हा प्लेऑफमध्ये पात्र ठरलेला पहिला संघ ठरला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. अजून इतर सघांनाही 16 गुणांचं गणित जुळवता येईल. पण जय पराजयाचं गणित पाहता गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचलेला पहिला संघ ठरला आहे.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या भावना व्यक्त केल्या. पॅट कमिन्स म्हणाला की, ‘खेळपट्टी बरीच कठीण दिसत होती. त्यांच्याकडून टी20 क्रिकेटमध्ये गोलंदाजीचा प्रयत्न चांगला होता. आमची फलंदाजी अप्रतिम झाली आहे. फलंदाजांनी 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मला वाटते की आम्ही 5 किंवा 6 सामने जिंकलो आहोत. या सामन्यांमुळे आम्हाला थोडी विश्रांती मिळाली.’

आयपीएल 2026 स्पर्धेतील या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात ट्रेव्हिस हेडची विकेट मिळाली. ट्रेव्हिस हेडला खातंही खोलता आलं नाही. तर अभिषेक शर्मा 6 धावांवर, इशान किशन 11 धावांवर, स्मरण रविचंद्रन 9 धावांवर, हेनरिक क्लासेने 14 धावांवर, सलील अरोरा 16 धावांवर, नितीश कुमार रेड्डी 2 धावांवर बाद झाले. अवघ्या 60 धावांवर महत्त्वाचे 7 फलंदाज तंबूत परतले होते. त्यामुळे कर्णधार पॅट कमिन्सवर झुंज देण्याची वेळी आली. शिवांग ठाकुरही 8 धावा करून तंबूत परतल्याने पराभव निश्चित झाला. पॅट कमिन्सला खेळही 19 धावांवर आटोपला. प्रफुल हिंगे बाद झाला आणि गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला. अवघ्या 86 धावांवर सर्व खेळाडू बाद झाले आणि गुजरातने हा सामना 82 धावांनी खिशात घातला.

Follow Us