AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : फिन एलनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यानंतर केकेआरचा संताप, पण…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने केकेआरवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. पण या सामन्यात बरंच काही घडलं. पहिल्या डावात फिन एलनची विकेटवरून बराच वाद रंगला.

IPL 2026 : फिन एलनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यानंतर केकेआरचा संताप, पण...
IPL 2026 : फिन एलनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यानंतर केकेआरचा संताप, पण...Image Credit source: PTI
| Updated on: Apr 10, 2026 | 4:50 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा पुढे सरकत असताना आता वादामुळे चर्चेत येत आहे. काही निर्णय वादग्रस्त ठरले असून त्याची चर्चा होत आहे. आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स सामन्यात डेविड मिलरचा षटकार असताना आऊट दिला. हेनरिक क्लासेनला असाच फटका बसला. आता कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यात असंच घडलं. केकेआरने नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी आली. खरं तर केकेआरने चांगली सुरूवात केली होती. पण फिन एलनची विकेट पडली आणि पावर प्लेमध्येच धावगतीला ब्रेक लागला. प्रिन्स यादवच्या गोलंदाजीवर दिग्वेश राठीने सीमेवर अप्रतिम झेल पकडला. पण त्याचा पाय बाउंड्री लाईनला लागल्याचं दिसलं. यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. मैदानी पंचांनी रिव्ह्यू घेतला नाही आणि त्याला बाद घोषित केलं. त्यामुळे वादाची ठिणगी पडली. असं असताना केकेआरने संताप व्यक्त केला आहे. पण या निर्णयाविरोधात अपील करणार नसल्याचं सांगितलं.

केकेआरचा रोवमॅन पॉवेलने सांगितलं की, असे निर्णय होत असतात आणि आम्ही त्याची चौकशी वगैरे काही करणार नाहीत. रोवमॅन पॉवेल म्हणाला की, ‘ साहजिकच, त्यांनी इतर बाबींचाही विचार करायला हवा होता. तो मैदानाबाहेर आल्यावरच आम्हाला याबद्दल कळले. आयपीएलमध्ये पंचांनी किरकोळ गोष्टींसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतल्याचे आपण पाहिले आहे, पण ही त्यांच्याकडून झालेली चूक असू शकते. आम्ही याची चौकशी करणार नाही. यामुळे दोन गुण गमावले गेले, असे आम्ही आता म्हणू शकत नाही.’

कोलकाता नाईट रायडर्ससाठी या पर्वाची सुरूवात काही चांगली झाली नाही. त्यांनी आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला. त्यामुळे प्रत्येकी एक गुण मिळाला. आता केकेआरची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे. केकेआरला प्लेऑफमध्ये संधी मिळवायची असेल तर उर्वरित 10 पैकी 7 सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...