मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरला आंद्रे रसेल आठवला! 21 चेंडूत पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली

आयपीएल 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना मुंबईने 6 विकेट राखून जिंकला. या सामन्यात कोलकात्याची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुमार राहिलं. तसेच 21 चेंडूत पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरला आंद्रे रसेल आठवला! 21 चेंडूत पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरला आंद्रे रसेल आठवला! 21 चेंडूत पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली
Image Credit source: KKR Twitter
| Updated on: Mar 30, 2026 | 4:44 PM

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: आयपीएल 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 14 वर्षांचा इतिहास बदलला. पहिल्या सामन्यात विजय मिळवून गेल्या काही वर्षांपासून पहिल्या सामन्यात पराभवाची साखळी मोडली. कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 4 गडी गमवून 220 धावा केल्या आणि विजयासाठी 221 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 6 गडी राखून पूर्ण केलं. पण या पराभवाची स्क्रिप्ट कोलकात्याच्या फलंदाजीवेळीच लिहिली गेली. यासाठी शेवटचे 21 चेंडू कारणीभूत ठरले. कोलकात्याच्या डावातील 21 चेंडू कसे काय कारणीभूत ठरतील? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर असं की, कोलकात्याने डेथ ओव्हरच्या 21 चेंडूत एकही षटकार मारला नाही. रिंकु सिंह आणि रमनदीप सिंग मैदानात होते. तरीही त्याने षटकार मारता आला नाही. त्यामुळे केकेआरच्या धावगतीला ब्रेक लागला.

केकेआरची सुरूवात पाहता 240 ते 250 धावा होणं गरजेचं होतं. पण केकेआरचा संघ 220 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे केकेआरला कुठे ना कुठे पावर हिटर आंद्रे रसेलची उणीव भासली. सध्या आंद्रे रसेल केकेआरचा पावर हिटिंग कोच आहे. केकेआरच्या डावात एकूण 10 षटकार लागले. पण डेथ ओव्हरच्या 21 चेंडूत एकही षटकार मारता आलानाही. 16.3 षटकावर अंगकृष रघुवंशीने शेवटचा षटकार मारला. त्यानंतर रिंकु सिंह पण फेल गेला. त्याने 21 पैकी 11 चेंडू खेळले पण एकही षटकार मारू शकला नाही. रिंकुने 21 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. आंद्रे रसेल होता तेव्हा शेवटच्या षटकात षटकारांची आतषबाजी करायचा. पण त्या ताकदीचा खेळाडू आता संघात दिसत नाही.

आंद्रे रसेलची जागा भरून काढण्यात रिंकु सिंह आणि रमणदीप सिंह अपयशी ठरले आहे. पहिल्या सामन्यात केकेआरला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण शेवटच्या षटकापर्यंत हा सामना गेला. यात आणखी 20 धावा असत्या तर कदाचित चित्र वेगळं असू शकलं असतं. त्यामुळे शेवटच्या षटकात काहीच धावा न आल्याचा फटका बसला. कोलकात्याची सुरूवात चांगली झाली होती. मुंबईला पहिल्या 10 षटकात पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं होतं. पण त्यानंतर धावगती राखण्यात कोलकात्याला पूर्णपणे अपयश आलं.

Follow Us