AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs KKR: मुंबईने 4 षटकात 49 धावा केल्या आणि कोलकात्याने कर्णधार बदलला, झालं असं की..

आयपीएल 2026 स्पर्धतील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 220 धावा केल्या. तसेच विजयासाठी 221 धावा दिल्या. पण चार षटकानंतर कोलकात्याने कर्णधार बदलला.

MI vs KKR: मुंबईने 4 षटकात 49 धावा केल्या आणि कोलकात्याने कर्णधार बदलला, झालं असं की..
MI vs KKR: मुंबईने 4 षटकात 49 धावा केल्या आणि कोलकात्याने कर्णधार बदलला, झालं असं की..Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 29, 2026 | 10:11 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सने जिंकला आणि कोलकात्याला प्रथम फलंदाजी दिली. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमवून 220 धावा केल्या. तसेच विजयासाठी 221 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी मुंबई इंडियन्सला चांगली सुरूवात करणं भाग होतं. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचं आव्हान होते. रोहित शर्मा आणि रायान रिकल्टन जोडीला याचं भान होतं. पण विकेट राखणंही तितकंच महत्त्वाचं होत. त्यामुळे पहिल्या दोन षटकात त्यांनी सावध सुरूवात केली. पहिल्या दोन षटकात फक्त 6 धावा आल्या. तर दुसऱ्या षटकात 9 धावा आल्याने मुंबई इंडियन्सवर दबाव वाढला. पण तिसऱ्या षटकापासून मुंबई इंडियन्सने आक्रमक खेळीला सुरूवात केली. तिसऱ्या षटकात 19 धावा आणि चौथ्या षटकात 15 धावा आल्या. मुंबई इंडियन्सने 4 षटकात एकही गडी न गमवता 49 धावा केल्या.

मुंबईच्या डावाचं पाचवं षटक सुरू होणार तितक्यात मैदानात एक घटना घडली. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात पडला. त्यामुळे काय झालं ते कळलंच नाही. सर्व जण अजिंक्य रहाणेच्या दिशेने धावत गेले. अजिंक्य रहाणेच्या पायाला क्रॅम्प आला होता. त्यामुळे त्याला फिल्डिंग करणं शक्य नव्हतं. फिजिओ मैदानात आले आणि मिनिटं त्यांनी उपचार केले. पण त्याला काही बरं वाटलं नाही. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. तर कर्णधारपदाची धुरा रिंकु सिंहच्या खांद्यावर आली. तर अजिंक्य रहाणेच्या जागी मनिष पांडे क्षेत्ररक्षणासाठी आला. अजिंक्य रहाणे मैदान सोडत असताना रोहित शर्माने त्याला डिवचलं. तेव्हा अजिंक्य रहाणेने स्मितहास्य केलं आणि तंबूच्या दिशेने निघाला.

मुंबई इंडियन्सने 221 धावांचा पाठलाग करताना पावर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली. मुंबई इंडियन्सने 6 षटकात 80 धावा केल्या. यात रायान रिकल्टनने 14 चेंडूत 29, तर रोहित शर्माने 23 चेंडूत 51 धावांची खेळी केली. रोहित शर्माने या खेळीत 3 चौकार आणि 5 षटकार मारले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...