KKR vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, शुबमन गिल गोलंदाजी घेत म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 60व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येत आहेत. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. कारण एका संघाच्या या सामन्यातून निकाल लागणार आहे.

KKR vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, शुबमन गिल गोलंदाजी घेत म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 16, 2026 | 7:12 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 60वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे.  खरं तर हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये अधिकृत स्थान मिळवणारा पहिला संघ ठरेल. तर कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफच्या स्पर्धेतून बाद होणारा तिसरा संघ ठरेल. तसं पाहिलं तर गुजरात टायटन्सने 16 गुण आहेत. त्यामुळे त्याचं प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्कं आहे. पण केकेआरचं स्थान डळमळीत आहे. खरं तर स्पर्धेतून पत्ता कापला गेला आहे. पण गुणांचं गणित पाहता अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही. या सामन्यात पराभूत होताच प्लेऑफची शर्यत संपेल. पण जिंकला तर आशा थोड्याफार जिवंत राहतील.  या स्पर्धेत दोन्ही दुसऱ्यांदा भिडणार आहेत. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 5 विकेट आणि 2 चेंडू राखून सामना जिंकला होता. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. काल थोडा पाऊस झाला होता. आम्हाला आशा आहे की दुसऱ्या डावात हवामान सुधारेल. आमची गोलंदाजी उत्कृष्ट राहिली आहे. सध्या आमच्या बाजूने वातावरण आहे. कोणत्याही संघाला हलक्यात घेण्याची ही वेळ नाही. जर तुम्ही पहिल्या दोनमध्ये आलात, तर तुम्हाला एक अतिरिक्त सामना मिळतो. तोच संघ घेऊन खेळणार आहोत.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, एका वेळी एकाच सामन्याचा विचार करत आहोत. आम्हाला तीन सामने जिंकावे लागतील आणि मग बघू काय होतं. आम्ही गेल्या पाच सामन्यांपासून खूप चांगला क्रिकेट खेळत आहोत. आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचाही विचार करत होतो. मैदानावर थोडा ओलावा आहे. मला नाही वाटत की त्यामुळे फार काही बदल होईल. वरुण संघात येईल, वरुण फिट आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, आंग्रिश रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज.

Follow Us