IPL 2026 Playoff: पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित लांबलं, सीएसकेचा मार्ग झाला सोपा

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 207 धावा केल्या आणि विजयासाठी 208 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही मुंबई इंडियन्सला गाठता आलं नाही. त्यामुळे आता प्लेऑफची वाट आणखी किचकट झाली आहे.

IPL 2026 Playoff: पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित लांबलं, सीएसकेचा मार्ग झाला सोपा
IPL 2026 Playoff: पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित लांबलं, सीएसकेचं मार्ग झाला सोपा
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 23, 2026 | 11:23 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने सहज खिशात घातला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने वाटेला प्रथम फलंदाजी आली. चेन्नई सुपर किंग्सला सुरूवातीला धक्के बसले. पण एका बाजूने संजू सॅमसनने प्रभावीपणे फलंदाजी केली. त्याने 54 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार मारत नाबाद 101 धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सला 207 धावांपर्यंत मजल मारता आली आणि विजयासाठी 208 दिल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने पावरप्लेमध्ये नांगी टाकली. त्यामुळे विजयाची स्क्रिप्ट ही पावरप्लेमध्ये लिहिली गेली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी खूपच संथ असल्याने  प्रत्येक षटकानंतर धावगती वाढत गेली. त्यामुळे मुंबई इंडियन्सवर प्रेशर वाढत गेलं. त्यानंतर जोरदार फटकेबाजी करण्याच्या नादात झटपट विकेट पडत गेल्या. त्यामुळे हा सामना पूर्णपणे चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात झुकला आणि जिंकलाही. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 103 धावांनी जिंकला.

मुंबई इंडियन्सचं गणित कठीण

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी खूपच कठीण परिश्रम करावे लागणार आहेत. मुंबई इंडियन्सने 7 सामने खेळले असून फक्त 2 सामन्याव विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना गमवल्याने दोन गुण तर गेलेच, वरून नेट रनरेटही उणे झाला आहे.  त्यामुळे गुणतालिकेत सातव्या स्थानावरून आठव्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. आता मुंबई इंडियन्सला उर्वरित सातपैकी 6 सामने जिंकावे लागणार आहेत. तर आणि तरच 16 गुणांचं गणित सुटेल. 16 गुण मिळवणारा संघ प्लेऑफमध्ये पोहोचतो. अन्यथा जर तरच गणित येईल. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी यापुढे प्रत्येक सामना करो या मरोची स्थिती असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सला दिलासा

मुंबई इंडियन्सला पराभूथ केल्याने चेन्नई सुपर किंग्सची स्थिती सुधारली आहे. आहे. चेन्नई सुपर किंग्सने सात सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामन्यात विजय मिळवले असून 6 गुण झाले आहेत. त्यामुळे पाच वेळा जेतेपदाचा मान मिळवलेला चेन्नई सुपर किंग्स संघ जेतेपदाच्या शर्यतीत असणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने आठव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच नेट रनरेटही जबरदस्त सुधारला आहे. आता 7 सामने शिल्लक असून 5 सामन्यात विजय मिळवला तर 10 गुण होतील. गुणतालिकेत 16 गुण असलेला संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवतो. त्यामुळे चेन्नईसाठी आव्हान सोपं झालं आहे.

Follow Us