AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं, शतकी खेळीसह नोंदवले इतके सारे विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. संजू सॅमसनने या सामन्यात शतक ठोकलं आणि विक्रम रचले.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं, शतकी खेळीसह नोंदवले इतके सारे विक्रम
IPL 2026 : मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं, शतकी खेळीसह नोंदवले इतके सारे विक्रमImage Credit source: CSK TWITTER
| Updated on: Apr 23, 2026 | 10:33 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबई इंडियन्सने गोलंदाजीला प्राधान्य दिलं. चेन्नई सुपर किंग्सला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि 20 षटकात 6 गडी गमवून 207 धावा केल्या. यात नाबाद 101 धावा एकट्या संजू सॅमसनच्या आहेत. त्याने या स्पर्धेतील दुसरं शतक ठोकलं. त्याने 54 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार मारून शतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 187.04चा होता. संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंग्सच्या डावातील शेवटच्या चेंडूवर शतकासाठी 3 धावांची गरज होती. त्याने क्रिश भगतला शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि शतक साजरं केलं. त्याच्या या शतकी खेळीमुळे या स्पर्धेत काही विक्रमांची नोंद करण्यात आली. चला जाणून घेऊयात संजू सॅमसनने या शतकी खेळीसह कोणते विक्रम रचले ते…

संजू सॅमसनने नोंदवले इतके सारे विक्रम

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संजू सॅमसन आता पाचव्या स्थानी आहे. त्याने केएल राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली. संजू सॅमसनचं आयपीएलमधील हे पाचवं शतक आहे. या यादीत विराट कोहली 8 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. जोस बटलरने 7, ख्रिस गेलने 6 शतकं ठोकली आहेत.

संजू सॅमसनचं एकाच पर्वात हे दुसरं शतक आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्ससाठी दुसरं शतक ठरलं आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्साठी शेन वॉटसन, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड यांनी दोन शतकं ठोकली आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये संजू सॅमसनच्या नावावर हे आठवं शतक आहे. भारतीय खेळाडूंच्या शतकांच्या यादीत त्याने रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहित शर्माच्या नावावर 8 शतकं आहेत. तर अभिषेक शर्मा आणि विराट कोहलीच्या नावावर 9 शतकं आहेत.

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा हा तिसरा मोठा स्कोअर आहे. यापू्र्वी 2021 मध्ये 218, 2008 मध्ये 208, 2026 मध्ये 207 आणि 2024 मध्ये 206 धावा केल्या होत्या.

संजू सॅमसनने या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 56 चेंडूत नाबाद 115 धावा केल्या होत्या. तर राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना 2021 मध्ये पंजाब किंग्स, 2019 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध शतक ठोकलं होतं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल