MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Match Result IPL 2026 : मुंबई इंडियन्सकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करुन 2025 मधील वानखेडेतील पराभवाची परतफेड करण्याची संधी होती. मात्र बंगळुरुने पुन्हा एकदा पलटणच्या घरात मैदान मारलं.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) रविवारी 12 एप्रिल रोजी डबल हेडरचा थरार रंगला. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर दिवसातील दुसऱ्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने होम टीम मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी धुव्वा उडवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 222 धावांपर्यंतच पोहचता आलं. रोमरियो शेफर्ड याने अखेरच्या काही षटकात फटकेबाजी करुन मुंबईला विजयापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. परिणामी मुंबईला पराभूत व्हावं लागलं. आरसीबीचा हा 4 सामन्यांमधील तिसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा सलग आणि तिसरा सामना पराभव ठरला.
आरसीबीची बॅटिंग
मुंबईने टॉस गमावून आरसीबीला बॅटिंगसाठी बोलावलं. आरसीबीने या संधीचा जबरदस्त फायदा उचलला आणि वानखेडे स्टेडियममध्ये आपला सर्वोच्च रन्सचा रेकॉर्ड केला. आरसीबीने 12 च्या रनरेटने धावा केल्या. आरसीबीसाठी पहिल्या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. तर दोघांनी दुहेरी आकडा गाठला. ओपनर फिलिप सॉल्ट याने सर्वाधिक 78 रन्स केल्या. विराट कोहली याने 38 बॉलमध्ये 50 रन्स केल्या.
कॅप्टन रजत पाटीदार याने 20 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 53 धावांची वादळी खेळी साकारली. टीम डेव्हीड याने फिनिशिंग टच दिला. टीमने 16 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्स लगावले. टीमने नाबाद 34 रन्स केल्या. जितेश शर्मा याने 10 धावा केल्या. तर ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, मिचेल सँटनर आणि शार्दूल ठाकुर या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
मुंबईची बॅटिंग
मुंबईच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र तिघांपैकी एकालाही अपेक्षित रनरेटनुसार धावा करता आल्या नाहीत. रोहितला दुखापतीमुळे सहाव्या ओव्हरदरम्यान रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. रोहितने 19 रन्स केल्या. मुंबईने रायनच्या रुपात पहिली विकेट गमावली. रायने 22 बॉलमध्ये 37 रन्स केल्या.
स्कोअरकार्ड
सूर्यकुमार यादव याने 33 धावा जोडल्या. तिलक वर्मा याने निराशा केली. तिलक 1 धावा करुन आऊट झाला. आरसीबीने ठराविक अंतराने झटके देत मुंबईला विजयासाठी आवश्यक भागीदारी करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. कॅप्टन हार्दिक पंड्या याच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र हार्दिकही निर्णायक क्षणी आऊट झाला. हार्दिकने 22 बॉलमध्ये 40 रन्स केल्या.
शेरफेन रुदरफोर्डची एकाकी झुंज
शेरफेन रुदरफोर्ड याने एकट्याने किल्ला लढवला. शेरफेनने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. शेरफेनने 31 बॉलमध्ये 71 रन्स केल्या. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले. मात्र शेरफेनच्या खेळीने मुंबईच्या पराभवाचं अंतर कमी झालं. आरसीबीसाठी सुयश शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.