PBKS vs DC Toss : दिल्लीकडे शेवटची संधी, पंजाब विरुद्ध एकूण 5 बदल, कुणाचा समावेश?

Punjab Kings vs Delhi Capitals Toss and Playing 11 : दिल्ली कॅपिट्ल्स आणि पंजाब किंग्स दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. जाणून घ्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहेत.

PBKS vs DC Toss : दिल्लीकडे शेवटची संधी, पंजाब विरुद्ध एकूण 5 बदल, कुणाचा समावेश?
PBKS vs DC Toss
Image Credit source: Bcci
| Updated on: May 11, 2026 | 7:50 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 55 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. पंजाबचा हा 11 वा आणि दिल्लीचा 12 वा सामना आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.  अक्षर पटेल दिल्लीचं तर श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन अक्षरने पंजाब विरुद्ध चेजिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीचे गोलंदाज पंजाबला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्लेइंग ईलेव्हन अपडेट

पंजाब किंग्सने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. बेन ड्वारशुइस याचा लॉकी फर्ग्यूसन याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 5 बदल करण्यात आले आहेत. दिल्लीच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये अभिषेक पोरेल, साहिल पारख, डेव्हिड मिलर, आकिब नबी दार आणि माधव तिवारी या 5 जणांना संधी देण्यात आली आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, साहिल पारख, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हीड मिलर, माधव तिवारी, मुकेश कुमार, आकिब नबी दार, मिचेल स्टार्क आणि लुंगी एन्गिडी.

पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कॅप्टन), सूर्यांश शेडगे, मार्कस स्टॉयनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, बेन ड्वारशुइस, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

Follow Us