AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs RR Qualifier 2 : वैभव सूर्यवंशीची चाबूक खेळी, आंद्रे रसेलचा महारेकॉर्ड ब्रेक

Fastest 1 Thousand Runs In IPL : राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज वंडर बॉय वैभव सूर्यवंशी याने झंझावाती खेळी साकारली. वैभवने यासह आंद्रे रसेल याचा रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे.

GT vs RR Qualifier 2 : वैभव सूर्यवंशीची चाबूक खेळी, आंद्रे रसेलचा महारेकॉर्ड ब्रेक
GT vs RR Qualifier 2 Vaibhav SooryavanshiImage Credit source: Bcci
| Updated on: May 30, 2026 | 1:29 AM
Share

वैभव सूर्यवंशी याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात अवघ्या 29 चेंडूत 97 धावांची वादळी खेळी केली होती. वैभवच्या या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सला हैदराबाद विरुद्ध एकतर्फी फरकाने विजय मिळवता आला होता. मात्र आता वैभवला क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध संघर्ष करावा लागला आहे. मात्र त्यानंतरही वैभवने दमदार अर्धशतक झळकावून राजस्थानचा डाव सावरला. वैभवने अर्धशतकी खेळीनंतर गिअर बदलला. वैभवला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र वैभवचं सलग दुसऱ्या सामन्यात शतक हुकलं. वैभव एलिमिनेटर सामन्यात 97 धावांवर बाद झाला होता. तर आता वैभवने 96 रन्स केल्या. वैभवचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. मात्र वैभवने मोठा विक्रम मोडीत काढला आहे. वैभवने नक्की काय केलंय? हे जाणून घेऊयात.

वैभवने गुजरात विरुद्ध 31 चेंडूत अर्धशतक केलं. त्यानंतर वैभवने टॉप गिअर टाकला. वैभवने पुढील 16 चेंडूत 46 धावा जोडल्या. वैभवने गुजरात विरुद्ध 47 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 8 फोरसह 96 धावा केल्या. वैभवने 204.26 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. वैभवने या दरम्यान आयपीएल स्पर्धेत आंद्रे रसेल याचा वेगवान 1 हजार रन्सचा रेकॉर्ड ब्रेक केला.

वेगवान 1 हजार धावा

वैभव आंद्रे रसेल याला मागे टाकत आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. वैभवने आंद्रे रसेल याच्या तुलनेत 105 चेंडूंआधी ही कामगिरी करुन दाखवली आहे. वैभवने 440 बॉलमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या. तर आंद्रे रसेल याने 1 हजार धावा करण्यासाठी 545 चेंडूंचा सामना केला होता.

आयपीएल स्पर्धेत वेगवान 1 हजार धावा करणारे फलंदाज

वैभव सूर्यवंशी : 440 बॉल

आंद्रे रसेल : 545 बॉल

टीम डेव्हिड : 560 बॉल

ट्रॅव्हीस हेड : 575 बॉल

फिल सॉल्ट : 575 बॉल

हेन्रिक क्लासेन : 594 बॉल

वीरेंद्र सेहवाग : 604

यशस्वी जैस्वालचा रेकॉर्ड ब्रेक

दरम्यान वैभव सूर्यवंशी याने  96 धावांच्या खेळीसह आपला सहकारी यशस्वी जैस्वाल याचा विक्रम मोडीत काढला. वैभवने 19 व्या मोसमात गुजरात विरुद्धच्या खेळीदरम्यान 700 धावांचा टप्पा पूर्ण केला. वैभव यासह 700 धावा करणारा पहिला अनकॅप्ड फलंदाज ठरला. याआधी यशस्वी जैस्वाल याच्या नावावर हा विक्रम होता. यशस्वीने 2023 साली 625 धावा केल्या होत्या.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...