Riyan Parag Vaping Controversy : बीसीसीआयची रियान परागवर थातुरमातुर कारवाई, खेळाडूंना कसा धाक राहिल?
रियान पराग याने ड्रेसिंग रुममध्ये ई सिगरेटचे झुरके मारले. रियान ड्रेसिंग रुममध्ये बसून दम मारो दम कार्यक्रम करत असल्याचं कॅमेरामॅनच्या लक्षात आलं. कॅमरामॅनने क्षणाचा विलंब न लावता रियानवर कॅमेरा फिरवला. इथून रियानच्या अडचणीत वाढ व्हायला सुरुवात झाली.

शेन वॉर्न याच्या नेतृत्वात स्पर्धेच्या पदार्पणातील मोसमातच (IPL 2008) चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत राजस्थान रॉयल्सने आयपीएल चॅम्पियन्स होण्याचा बहुमान मिळवला होता. त्यानंतर आता 18 वर्षांनंतर 19 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा युवा कर्णधार रियान पराग याची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. रियानची चर्चा त्याच्या कामगिरीसाठी कमी आणि नको त्या कारणामुळे पाहायला मिळत आहे. रियान ड्रेसिंग रुममध्ये काही दिवसांपूर्वी केलेल्या एका कृतीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. रियानच्या अवघ्या काही सेकंदांच्या व्हीडिओने भारतीय क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्य गोटात असलेला 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने त्याच्या आक्रमक बॅटिंगने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. तर दुसऱ्या बाजूला रियानने व्हेपिंग केल्याने वाद ओढावून घेतला आहे. कहर म्हणजे रियानने खासगी ठिकाणी नाही तर चक्क ड्रेसिंग रुममध्ये व्हेपिंग केलं. त्यामुळे रियानला आपण कुठे आहोत? आपल्यावर एका संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे, आपण काय वागतोय? या जबाबदारीचा विसर पडलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित...