IPL 2026, SRH vs LSG: नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने, कर्णधार पंत म्हणाला की..

आयपीएल 2026 स्पर्धेतील दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात विजयी ट्रॅकवर परतण्याचा लखनौ सुपर जायंट्सचा प्रयत्न असणार आहे. तर सनरायझर्स हैदराबाद विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

IPL 2026, SRH vs LSG: नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने, कर्णधार पंत म्हणाला की..
IPL 2026, SRH vs LSG: नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने, कर्णधार पंत म्हणाला की..
Image Credit source: IPL Twitter Video Grab
| Updated on: Apr 05, 2026 | 3:24 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सचा दुसरा सामना, तर सनरायझर्स हैदराबादचा तिसरा सामना आहे. गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये जागा मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने शर्यत सुरू झाली आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना हा विजय खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरतो. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी चांगली आहे, त्यांना प्रथम फलंदाजी करू द्या, आणि आम्ही दुसऱ्या डावात त्यांच्यावर दबाव आणू. हे काही नवीन आव्हान नाही, पण हा एक असा संघ आहे जो आम्हाला अडचणीत आणू शकतो. खेळपट्टी नक्कीच चांगली दिसतेय, पण त्यात काहीतरी गडबड आहे. पहिल्या 6 षटकांनंतर चेंडू खेळपट्टीवर थांबू शकतो. फक्त एक बदल केला आहे. मणिकरण सिद्धार्थ संघात आला असून नॉर्जे बाहेर आहे.’

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन म्हणाला की, ‘खूप आनंद झाला, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळायला मिळणे नेहमीच छान वाटते. दोन बदल केले आहेत. लिव्हिंगस्टोन आणि हर्षल पटेल संघात आले आहेत. हर्षलने इथे नेहमीच चांगली कामगिरी केली आहे, तर लिव्ही आम्हाला ऑफ-स्पिन देईल. निर्णयक्षमता सर्वात महत्त्वाची आहे, चांगला प्रयत्न करा आणि आपल्या योजनांची अंमलबजावणी करा. दोन गुण मिळवणे महत्त्वाचे आहे, पण आपल्याला शांत राहून एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), एडन मार्कराम, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मनिमरन सिद्धार्थ, आवेश खान, मोहम्मद शमी, दिग्वेश सिंग राठी, प्रिन्स यादव.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर/कर्णधार), हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट

Follow Us