6,6,6,6,6,4,4,4,4,4 अभिषेक शर्माचा झंझावात, पंजाब किंग्सविरुद्ध 18 चेंडूत ठोकलं आक्रमक अर्धशतक

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली. पण अभिषेक शर्माने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.

6,6,6,6,6,4,4,4,4,4 अभिषेक शर्माचा झंझावात, पंजाब किंग्सविरुद्ध 18 चेंडूत ठोकलं आक्रमक अर्धशतक
6,6,6,6,6,4,4,4,4,4 अभिषेक शर्माचा झंझावात, पंजाब किंग्सविरुद्ध 18 चेंडूत ठोकलं आक्रमक अर्धशतक
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 11, 2026 | 4:21 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 17व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला विजयी ट्रॅकवर राहण्याचं आव्हान होतं. कारण आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यापैकी 2 सामन्यात पराभव आणि एका सामन्यात विजय मिळवला आहे. नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सनरायझर्स हैदराबादच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या संधीचा फायदा अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने उचलला. पावरप्लेच्या सहा षटकात त्यांनी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अभिषेक शर्माचा झंझावात या सामन्यात पाहायला मिळाला. अभिषेक शर्माने झझंझावाती खेळी केली. त्याने 18 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. यासह या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याचा स्ट्राईक रेट हा 278.95 पेक्षा अधिकचा होता.

आयपीएल स्पर्धेत अभिषेक शर्माने पंजाब किंग्सविरुद्ध सलग तिसऱ्या अर्धशतकाची नोंद केली आहे. यापूर्वी आयपीएल 2024 आणि आयपीएल 2025 मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. आता आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्ससमोर तिसरं अर्धशतक ठोकलं आहे. अभिषेक शर्माने पावरप्लेच्या 6 षटकातील 22 चेंडू खेळले आणि त्यात 66 धावा केल्या. यावेळी त्याच्या नावावर 5 चौकार आणि 7 षटकार होते. तसेच स्ट्राईक रेट हा 300 चा होता. सनरायझर्स हैदराबादने 6 षटकात विना बाद 105 धावा केल्या. यावेळी ट्रेव्हिस हेडने 15 चेंडूत 31 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा 28 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकार मारून शशांक सिंगच्या गोलंदाजीवर 74 धावा करून बाद झाला. शशांकने त्याला दुसऱ्यांदा बाद केलं आहे.

 

अभिषेक शर्माचे विक्रमी षटकार

आयपीएलच्या एका डावात 1 ते 6 षटकांत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अभिषेक शर्माने एन्ट्री मारली आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळताना सनथ जयसूर्याने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध 2008 मध्ये 7 षटकार मारले होते. 2018 मध्ये जोस बटलरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 7 षटकार मारले होते. जॉनी बेअरस्टोने 2022 मध्ये पंजाब किंग्ससाठी खेळताना आरसीबीविरुद्ध 7 षटकार मारले होते. आता अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना पंजाब किंग्सविरूद्ध 7 षटकार मारले आहेत. आयपीएल स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

Follow Us