IPL 2026 स्पर्धेत काळी जादू! चेन्नई सुपर किंग्सने केली बीसीसीआयकडे तक्रार? खरं काय जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली. पण या सामन्यानंतर एक व्हिडीओ आणि एक पत्र व्हायरल होत आहे. नेमकं काय खरं आणि काय खोटं ते जाणून घेऊयात

आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत वाढली आहे. प्रत्येक टॉप 4 मध्ये राहण्यासाठी लढत देत आहेत. दुसरीकडे, चाहतेही आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही जण मैदानात उपस्थित राहून, काही जण सोशल मीडियावरून, तर काही जण वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून संघाला प्रोत्साहन देत आहेत. पण चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्टेडियममध्ये आपला संघ जिंकावा म्हणून काळी जादू केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यानंतर आणखी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात बीसीसीआयकडे तक्रार केल्याचं दिसत आहे. पण यापैकी नेमकं काय खरं आणि काय खोटं यावरून एक वेगळी चर्चा रंगली आहे. कारण सोशल मीडियावर जे काही असतं ते सगळं खरं असतं असं नाही.
18 एप्रिल 2026 रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 10 धावांनी जिंकला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स चांगल्या स्थितीत होती. मात्र त्याने एका पाठोपाठ एक धडाधड विकेट पडत गेल्या आणि चेन्नईचा पराभव झाला. त्यानंतर एक काळी जादू केल्याचा व्हिडीओ समोर आला आणि खळबळ उडाली. यात एक सनरायझर्स हैदराबादचा फॅन हातात लिंबू घेऊन काही तरी पुटपुटतो आणि त्यावर फुंकर मारतो. व्हिडीओनुसार लगेच फलंदाजी करणारा शिवम दुबे त्रिफळाचीत होतो. खरं तर या सर्व अंधश्रद्धा आहेत. असं कधी होत नसतं. पण त्या व्हायरल व्हिडीओवरून चर्चांना उधाण आलं आहे.
Black magic live 😭 pic.twitter.com/rzJYd6kjti
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) April 19, 2026
सोशल मीडियावर एक पत्रही व्हायरल होत आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्सने बीसीसीआयकडे तक्रार केल्याचं बोललं जात आहे. एसआरएचच्या चाहत्याने काळी जादू केल्याने पराभूत झाल्याचा आरोप आहे. ही तक्रार बीसीसीआयकडे केल्याचा त्यातून दावा केला आहे. पण ते पत्र खरं आहे का? बीसीसीआयला अशी काही तक्रार केली आहे का?
. @ChennaiIPL lodged a complaint with @BCCI https://t.co/kvPTdZNCn1 pic.twitter.com/XsPOAWu9cJ
— Maximus Chaturvedi 🪷 (@PsychoSainik) April 19, 2026
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील चाहत्याची स्टेडियममधील कृती खरी आहे. तसेच विकेट पडल्याची घटनाही बरोबर आहे. पण हा व्हिडीओ एडिटेड आहे. वेगवेगळे व्हिडीओ एकत्र करून तसं दाखवलं गेलं आहे. खोडसाळपणा असल्याचं यातून स्पष्ट होतं. तर सीएसकेच्या नावाने व्हायरल होत असलेलं पत्र बनावट आहे. त्यात काहीच तथ्य नाही. अशीच कोणतीच तक्रार बीसीसीआयकडे केलेली नाही. त्यामुळे व्हिडीओ एडिटेड आहे, तर पत्र बनावट आहे.