AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SAW vs INDW Womens T20 WC Score Updates : दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सने विजय, भारताचा पहिला पराभव

| Updated on: Jun 22, 2026 | 2:06 AM
Share

South Africa vs India, Womens T20 World Cup 2026 Score Updates and Highlights In Marathi: दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स यांच्यातील सामना मँचेस्टरमध्ये खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून 2 गुणांची कमाई केली.

SAW vs INDW Womens T20 WC Score Updates : दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सने विजय, भारताचा पहिला पराभव
SAW vs INDW Live UpdatesImage Credit source: Icc X Account

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 तगडे आमनेसामने होते. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमध्ये करण्यात आलं होतं. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना होता. भारताला हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत करुन सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं होंत. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 5 बॉलआधी 6 विकेट्स राखूण पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा विजय ठरला. भारताला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 21 Jun 2026 10:24 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सने विजय, भारताचा पहिला पराभव

    मारिजान काप हीने केलेल्या नाबाद खेळीच्या जोरावर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील दुसरा सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान मारिजान काप हीने केलल्या नाबाद 81 धावांच्या खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 2 गुणांची कमाई केली. तर भारताचा हा या 10 व्या पर्वातील पहिला पराभव ठरला.

  • 21 Jun 2026 10:17 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : नाडीन डी क्लार्क बोल्ड, दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका, सामना रंगतदार स्थितीत

    श्री चरणी हीने नाडीन डी क्लार्क हीला बोल्ड करत दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका दिला आहे. त्यामुळे सामना रगंतदार स्थितीत पोहचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 159 रन्सचा पाठलाग करताना 17.5 ओव्हरमध्ये 4 आऊट 137 असा झाला आहे.

  • 21 Jun 2026 10:11 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका, भारताला निर्णायक क्षणी विकेट

    शफाली वर्मा हीने भारताला निर्णायक क्षणी विकेट मिळवून दिली आहे. शफालीने 17 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर ताझमिन ब्रिट्स हीला श्री चरणी हीच्या हाती कॅच आऊट केलं. ताझमिनने 36 बॉलमध्ये 40 रन्स केल्या.

  • 21 Jun 2026 10:08 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिका विजयाच्या दिशेने, भारत कमबॅक करणार?

    दक्षिण आफ्रिकेने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दक्षिण आफ्रिकेने 159 धावांचा पाठलाग करताना 16 ओव्हरमध्ये 122 रन्स केल्या आहेत.त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 24 बॉलमध्ये 37 रन्सची गरज आहे. त्यामुळे भारतीय संघ इथून पुनरागमन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 21 Jun 2026 09:50 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेची सामन्यावर पकड, टीम इंडियाला विकेट्सची गरज

    दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर पकड मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेने 159 धावांचा पाठलाग करताना 13 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 90 धावा केल्या आहेत. मारीजान काप 38 आणि ताजमिन ब्रिट्स 31 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 42 बॉलमध्ये आणखी 69 रन्सची गरज आहे.

  • 21 Jun 2026 09:20 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : श्री चरणीची कमाल, दक्षिण आफ्रिकेला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके

    श्री चरणी हीने कमाल केली आहे. श्री ने एकाच ओव्हरमध्ये 2 झटके देत दक्षिण आफ्रिकेला बॅकफुटवर टाकलं आहे. कॅप्टन लॉरा वॉल्डवर्ट हीला आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. त्यानंतर ॲनेरी डेर्कसेन हीला श्री ने बोल्ड केलं.

  • 21 Jun 2026 09:15 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : भारताला मोठं यश, दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन आऊट

    भारताला मोठं यश मिळालं आहे.  श्री चरणी हीने डावातील सहाव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर भारताला हवी असलेली विकेट मिळवून दिली आहे. श्रीने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्डवॉर्ट हीवा आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. अशाप्रकारे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला.

  • 21 Jun 2026 09:10 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेची सावध सुरुवात, टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात

    दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने सावध सुरुवात करत 4 ओव्हरमध्ये 19 रन्स केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या विकेटच्या शोधात आहे.

  • 21 Jun 2026 08:58 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 159 धावांचं आव्हान, टीम इंडिया जिंकणार?

    दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेकडून ताजमिन ब्रिट्स आणि लॉरा वॉल्डवॉर्ड ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 21 Jun 2026 08:43 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान, टीम इंडिया जिंकणार?

    वुमन्स टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. भारतासाठी शफाली वर्मा हीने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर दीप्ती शर्मा हीने 29 आणि कर्णधार हरमनप्रीत कौर हीने 24 धावांचं योगदान दिलं.

  • 21 Jun 2026 08:40 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : ऋचा घोष आऊट, भारताला सातवा झटका

    ऋचा घोष हीच्या रुपात भारताने सातवी विकेट गमावली आहे. ऋचाने 14 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. ऋचाने या खेळीत 2 चौकार लगावले. मात्र ऋचा फिनिशिंग देण्यात अपयशी ठरली.

  • 21 Jun 2026 08:30 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : दीप्ती शर्मा आऊट, आता ऋचा घोषवर मदार

    दक्षिण आफ्रिकेने भारताला सहावा झटका दिला आहे. मलाबाने दीप्ती शर्मा हीला आऊट केलं. दीप्तीने 21 बॉलमध्ये 3 फोरसह 29 रन्स केल्या. त्यामुळे आता ऋचा घोष हीच्यावर भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहे.

  • 21 Jun 2026 08:19 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : हरमनप्रीत कौर बाद

    टीम इंडियाला हरमनप्रीत कौरच्या रूपाने पाचवा धक्का बसला आहे. हरमनप्रीत कौर 22 चेंडूत 2 चौकार मारत 24 धावा करून बाद झाली.

  • 21 Jun 2026 08:08 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : हरमनप्रीत-दीप्तीवर जबाबदारी, भारताला मोठ्या भागीदारीची गरज

    दक्षिण आफ्रिकेने भारताला ठराविक अंतराने झटके दिलेत. त्यामुळे भारताची निराशाजनक सुरुवात झाली. त्यामुळे आता कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या जोडीवक मोठी जबाबदारी आहे. या दोघीनी भारताला 14 ओव्हरमध्ये 4 आऊट 113 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. हरमनप्रीत 23 आणि दीप्ती 15 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.

  • 21 Jun 2026 07:55 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : तु चल, मी आले! टीम इंडियाला चौथा झटका, जेमिमाह रॉड्रिग्स आऊट

    दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला ठराविक अंतराने झटके देण्याचा कार्यक्रम सुरुच ठेवला आहे. नॅडीन डी क्लर्क हीने आपल्याच बॉलिंगवर जेमीमाह रॉड्रिग्ज हीला कॅच आऊट केलं आहे. जेमीमाहने 14 बॉलमध्ये 12 रन्स केल्या.

  • 21 Jun 2026 07:42 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : यास्तिका भाटीया एलबीडब्ल्यू, टीम इंडियाला तिसरा झटका

    भारताने तिसरी विकेट गमावली आहे. अयाबोंगा खाका हीने यास्तिका भाटीया हीला एलबीडब्ल्यु आऊट केलं. यास्तिकाने 13 बॉलमध्ये 3 फोरसह 15 रन्स केल्या. यास्तिका आऊट झाल्याने भारताचा स्कोअर 7.2 ओव्हरमध्ये 3 आऊट 67 असा झाला आहे.

  • 21 Jun 2026 07:30 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : स्मृतीनंतर शफाली आऊट, भारताची सलामी जोडी माघारी

    दक्षिण आफ्रिकेने भारताला दुसरा झटका दिला आहे. स्मृती मंधाना हीच्यानंतर शफाली वर्मा आऊट झाली आहे. शफाली वर्मा हीने 15 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 31 रन्स केल्या. शबनीम इस्माईल हीने शफालीला आऊट केलं.

  • 21 Jun 2026 07:16 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : स्मृती मंधाना बोल्ड, भारताला पहिला झटका

    भारताने आश्वासक सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. उपकर्णधार आणि सलामीवीर स्मृती मंधाना रचनात्मक शॉट मारण्याच्या प्रयत्ना मारिजान काप हीच्या बॉलिंगवर तिसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर बोल्ड झाली. स्मृतीने 12 बॉलमध्ये 17 रन्स केल्या.

  • 21 Jun 2026 07:05 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : सामन्याला सुरुवात, भारताची बॅटिंग, शफाली-स्मृती मैदानात

    भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी बॅटिंगसाठी मैदानात आली आहे. या दोघी भारताला कशी सुरुवात मिळवून देतात याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 21 Jun 2026 06:53 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन :

    लॉरा वोल्वार्ड्ट (कॅप्टन), ताझमिन ब्रिट्स, ॲनेरी डेर्कसेन, डेन व्हॅन निकेर्क, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन (विकेटकीपर), सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा.

  • 21 Jun 2026 06:53 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, श्री चरणी आणि नंदनी शर्मा.

  • 21 Jun 2026 06:35 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंगचा निर्णय

    वुमन्स टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाज आता दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 21 Jun 2026 06:22 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका सामना, थोड्याच वेळात टॉस

    क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची प्रतिक्षा आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

  • 21 Jun 2026 06:20 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : दक्षिण आफ्रिका वुमन्स टीम इंडिया

    लॉरा वोल्वार्ड्ट (कर्णधार), सुने लुस, अॅनेरी डर्कसेन, मारिझान काप, नॅडीन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन, कायला रेनेके, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा, काराबो मेसो, तुमी सेखुखुने, तझमिन ब्रिट्स आणि डेन व्हॅन निकेर्क.

  • 21 Jun 2026 06:17 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया

    हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, राधा यादव, भारती फुलमाळी आणि प्रेमा रवा.

  • 21 Jun 2026 06:13 PM (IST)

    SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान

    वुमन्स टीम इंडिया वर्ल्ड कप 2026 मोहिमेतील आपला सलग तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र भारतासाठी हा विजय पहिल्या 2 सामन्यांच्या तुलनेत सोपा नसणार. भारतासमोर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा या सामन्यात कस लागणार आहे.

Published On - Jun 21,2026 6:13 PM

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ