IPL खेळाडूंना 150 कोटी पगार! आयपीएलचं वादळ आणणाऱ्या बड्या व्यक्तीच्या दाव्याने क्रिकेट जगत हैराण
IPL 2030 Brand Valuation Upto 150 Crore: आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला 150 कोटी पगार मिळण्याचे भाकीत आयपीएलची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या ललित मोदी यांनी केले आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

Per Player IPL Salary Upto 150 Crore: इंडियन प्रिमियम लिगचे संस्थापक ललित मोदी यांनी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. IPL 2026 सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स फ्रॅचाईजी 1.63 अब्ज अमेरिकन डॉलरला विकल्या गेली. तर RCB तर त्यापेक्षा अधिक म्हणजे 1.78 अब्ज अमेरिकन डॉलरची विक्री झाली. या आकडेवारीने अनेकांचे डोळे विस्फारले. जगातील सर्वात श्रीमंत लिगपैकी आयपीएल एक आहे. आयपीएलची संकल्पना ललित मोदी यांनी प्रत्यक्षात आणली. त्यांच्या मते, 2030 मध्ये एक खेळाडू 150 कोटी रुपये कमवेल.
100 दशलक्ष डॉलरचे टीम पर्स
IPL मध्ये सध्या पर्स 125 कोटी रुपये आहे. त्याचा अर्थ असा आहे की, टीम जास्तीत जास्त 25 खेळाडूंचा स्क्वाड तयार करण्यासाठी 125 कोटी रुपये (जवळपास 15 दशलक्ष डॉलर) खर्च करू शकते. ललित मोदी यांच्या मते, पुढील पाच वर्षांनी टीमचा हा खर्च 100 दशलक्ष डॉलरच्या घरात पोहचला. ही रक्कम 930 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मोदी यांची भविष्यवाणी खरी ठरली तर टीम पर्समध्ये 7 पटीहून अधिक वाढ होईल.
एका खेळाडूची कमाई 150 कोटी
ऋषभ पंत हा सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांत खरेदी केले होते. दुसर्या क्रमांकवर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर हा आहे. त्याला 26.75 कोटी रुपये मिळाले.
मायकल वॉन याच्या द ओव्हरलॅप पॉडकास्टमध्ये ललित मोदी यांनी हे भाकीत केले. आगामी पाच वर्षात खेळाडूंची बोली 5 पट अधिकने वाढण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. त्यांच्या मते, 2030 पर्यंत एक खेळाडूला आयपीएल करारातून 130-150 कोटी रुपयांपर्यंत कमाई करता येईल. त्यांनी ही रक्कम जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टॉप 3-4 खेळाडूला लिलावात सहज मिळेल असे ते म्हणाले. काही वृत्तानुसार, ब्रँड व्हॅल्यूबाबत IPL ही जगातील दुसरी सर्वात मोठी लीग आहे. अमेरिकेत खेळली जाणारी NFL (नॅशनल फुटबॉल लीग) ही जगातील सर्वात महागडी लीग आहे. त्यात खोऱ्याने पैसा आहे. तर आयपीएलने NBA, MLB सारख्या आयकॉनिक लीगला पिछाडीवर टाकले आहे.