IPL 2022 Final : 800चं तिकीट 8 हजाराला, 1500चं 15 हजाराला! तर सर्वाधिक किंमतीची 65 हजारांची तिकीटंही सोल्डआऊट

आयपीएल अंतिम लढतीचे सर्वात स्वस्त तिकीट 800 रुपये तर सर्वात महागडे तिकीट 65 हजार रुपये किंमतीचे आहे.

IPL 2022 Final : 800चं तिकीट 8 हजाराला, 1500चं 15 हजाराला! तर सर्वाधिक किंमतीची 65 हजारांची तिकीटंही सोल्डआऊट
आयपीएल तिकीटImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 6:56 AM

अहमदाबाद : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात टाटा आयपीएलची अंतिम लढत गुजरातच्या अहमदाबादमधील (ahmedabad) भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवली जाणार आहे. या मेगाफायनल लढतीची ऑनलाईन तिकिटे काही तासांतच विकली गेलीय. ज्यांना तिकीट मिळाली नाहीत. ते क्रिकेटप्रेमी नऊपट अधिक दराने पंधराव्या आयपीेलच्या पंधराव्या सीजनच्या फायनलचे तिकीट विकत घ्यायला तयार आहेत. 800 रुपयांच्या तिकिटासाठी 8 हजार रुपये तर 1500 रुपयांच्या तिकिटासाठी 15हजार रुपये मोजण्याचीही तयारी काही क्रिकेटप्रेमींनी दर्शवली आहे. विशेष म्हणजे सर्व आलिशान सोयी आणि अंतिम लढतीसह एलिमिनेटर-2 लढत पाहण्याची संधी सर्वात महागड्या 65 हजार किंमतीच्या तिकिटावर मिळणार आहे. ही सर्वात महागडी तिकिटेही काही तासांतच विकली गेली हे विशेष.

आयपीएलमध्ये तिकिटांचा काळाबाजार?

यंदाच्या पंधराव्या टाटा आयपीएलची अंतिम लढत प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन पाहण्याला क्रिकेटशौकीन पसंती देताना दिसत आहे. आयपीएल अंतिम लढतीचे सर्वात स्वस्त तिकीट 800 रुपये तर सर्वात महागडे तिकीट 65 हजार रुपये किंमतीचे आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 32 हजार इतकी मोठी आहे. यंदाची आयपीएलची लढत रविवारी असल्याने हे स्टेडियम खचाखच भरण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल आवडणाऱ्यांनी तिकिटावर उड्या घेत आधीच सर्व तिकीटे विकत घेतली आहे. त्यामुळे यंदा अहमदाबादमध्ये रविवारी आयपीएल फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

65 हजारांचं रॉयल तिकीट

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सर्वात महागडं तिकीट 65 हजार रुपयांचं आहे. हे महागडं तिकीट खरेदी करणाऱ्याला क्वालिफायर-2 आणि आयपीएल अंतिम लढत पाहायला मिळणार आहे. तिकीटधारकांसाठी वेगळी केबिन, जेवण, टीव्ही सेट आणि आरामदायक सोफा पुरवला जाणार आहे. विशेष म्हणजे ही महागडी तिकिटे काही तासांतच विकल्या केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

अहमदाबादचे हॉटेलंही फुल्ल

आता आयपीएल फायनल म्हटलं की क्रिकेटशौकीन आधी तिकीट बुक करून घेण्याच्या प्रयत्नात असतात. अहमदाबाद शहरातील सर्व लहान मोठ्या निवासी हॉटेलांचे बुकिंग आताच हाऊसफुल्ल झाले आहेत. आयपीएल फायनल बघायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या मोठ्या संख्येमुळे देशातील अन्य महानगरांतून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठीची तिकिटेही मोठ्या प्रमाणात महागली आहे. सात हजार रुपये दैनिक भाड्याच्या डिलल्स रुमचे बुकिंग आता तब्बल पंधरा हजार रुपये मोजून केले जातायेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.