IPL 2024 Orange Cap च्या शर्यतीत सुनील नरीनची मोठी झेप

| Updated on: Apr 16, 2024 | 11:32 PM

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरीन याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध खणखणीत शतक ठोकत ऑरेंज कॅपसाठी दावा ठोकला आहे.

IPL 2024 Orange Cap च्या शर्यतीत सुनील नरीनची मोठी झेप
IPL 2024 ORANGE CAP
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमात दिवसेंदिवस पर्पलसह ऑरेंज कॅपसाठी गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आणि जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला पर्पल आणि ऑरेंज कॅप दिली जाते. या 17 व्या हंगामातील 31 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत झालेल्या बदलाबद्दल आपण जाणून घेऊयात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्या नावावर ऑरेंज कॅप आहे. विराटने 7 सामन्यात 2 अर्धशतक आणि 1 शतकासह सर्वाधिक 361 धावा केल्या आहेत. विराटला ऑरेंज कॅप आपल्याकडे कायम राखण्यात यश आलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने दुसरं स्थान भक्कम करत 300 धावांचा टप्पा पार केला आहे. रियानने कोलकाता विरुद्ध या सामन्यात 14 बॉलमध्ये 34 धावांची खेळी केली. रियानच्या नावावर या खेळीसह एकूण 7 सामन्यात 307 धावा झाल्या आहेत.

सुनील नरीन तिसऱ्या स्थानी

कोलकाताचा फलंदाज सुनील नरीन याने राजस्थान विरुद्धच्या या सामन्यात शतकी खेळी केली. सुनीलने यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. सुनीलने 56 बॉलमध्ये 109 धावांची खेळी केली. सुनीलच्या टी 20 कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं. सुनील या शतकाआधी टॉप 5 च्या आसपासही नव्हता. मात्र शतक ठोकून त्याने तिसरं स्थान गाठलं. सुनीलने 6 सामन्यात एकूण 276 धावा केल्या आहेत.

चौथ्या स्थानी राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन आहे. संजूने कोलकाता विरुद्ध 12 धावा केल्या. संजूच्या नावावर यासह 7 सामन्यात 276 धावा झाल्या. संजू आणि सुनील दोघांच्या नावावर संयुक्तरित्या 276 धावा आहेत. मात्र संजूच्या तुलनेत सुनीलने 1 सामना कमी खेळून या धावा केल्या आहेत. त्यामुळे सुनील तिसऱ्या आणि संजू चौथ्या स्थानी आहे. तर पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा आहे. रोहितने 6 सामन्यात 1 शतकासह 261 धावा केल्या आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.