IPL 2023 Points Table | पंजाबची दिल्लीला एकच फाईट, पॉइंट्स टेबलमधील वातावरण आणखी टाईट, 4 जागांसाठी आता 9 संघांमध्ये रस्सीखेच

| Updated on: May 13, 2023 | 11:09 PM

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : आयपीएल 2023 स्पर्धेतून दिल्ली कॅपिटल्स बाद झालेला पहिला संघ आहे. आता प्लेऑफसाठी नऊ संघांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. जसा एक एक सामना पार पडेल तसं हे गणित सुटत जाईल.

IPL 2023 Points Table | पंजाबची दिल्लीला एकच फाईट, पॉइंट्स टेबलमधील वातावरण आणखी टाईट, 4 जागांसाठी आता 9 संघांमध्ये रस्सीखेच
IPL 2023 Points Table | दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतून बाद, 9 संघांना प्लेऑफची अजूनही संधी, जाणून घ्या जर तरच गणित
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता जर तरच कोणतंच गणित दिल्लीसाठी कामी येणार नाही. त्यामुळे उर्वरित सामने केवळ औपचारिकता असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 12 सामने खेळले असून 4 सामन्यात विजय, तर 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे 8 गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहे. आता उर्वरित सामन्यात दिल्लीचा संघ पंजाब आणि चेन्नईचं गणित बिघडवू शकते. सध्या नऊ संघांमध्ये प्लेऑफसाठी जबरदस्त चुरस आहे.

गुजरात टायटन्स 12 सामने खेळला असून 8 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. गुजरातचे 16 गुण आहेत. गुजरातचे पुढचे दोन सामने हैदराबाद आणि गुजरात सोबत आहेत. त्यापैकी एक सामना जिंकला की प्लेऑफचं तिकीट मिळणार आहे.

सीएसके 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित दोन सामने कोलकाता आणि दिल्ली सोबत आहेत. त्यापैकी एक सामना जिंकला की प्लेऑफचं गणित सुटेल.

मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. 14 गुण असून अजून दोन सामने उरले आहेत. दोन पैकी दोन सामने जिंकणं गरजेचं आहे. मुंबईचा पुढचा सामना लखनऊ आणि सनराईजर्स हैदराबादसोबत आहे.रनरेट चांगला ठेवणंही गरजेचं आहे.

लखनऊ सुपर जायंट्स 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. उर्वरित दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकात्यासोबत सामना आहे. पावसामुळे एक गुण वाटेला आल्याने त्याचा फायदा होईल.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. राजस्थानला आणखी दोन सामने खेळायचे आहे. या दोन्ही सामन्यात विजय आवश्यक आहे. बंगळुरु आणि पंजाबसोबत सामने आहेत. त्याचबरोबर टॉप 4 मधील संघाचा पराभव होणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

पंजाब किंग्सने दिल्लीला पराभूत करत सहावं स्थान गाठलं आहे. 12 गुण असून अजून सामने खेळायचे आहेत. पंजाबला दिल्ली आणि राजस्थान विरुद्ध सामने खेळायचे आहेत. त्यामुळे दोन्ही सामन्यात विजय आवश्यक आहेत. त्याचबरोर टॉपमधील संघ पराभूत होणं गरजेचं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. पण बंगळुरुला अजून 3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे तिन्ही सामने जिंकले तर 16 गुण खात्यात पडतील. पण टॉपमधील संघांचा पराभव होणंही तितकंच गरजेचं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची स्थितीही बंगळुरुसारखीच आहे.कोलकात्याचे 10 गुण आहेत. पण दोन सामनेच उरले आहेत. त्यामुळे 14 गुण होतील. कोलकात्याचे पुढचे दोन सामने चेन्नई आणि लखनऊसोबत आहेत. प्लेऑफमध्ये जाण्याची संधी कमीच आहे. पण उलटफेल झाल्यास त्यांनाही संधी आहे.

सनराईजर्स हैदराबादकडे तशी संधी खूपच जर तरची आहे. एक तर तीन सामने जिंकणं भाग आहे. त्यात टॉपच्या संघांमध्ये खूपच मोठा उलटफेर होणं गरजेचं आहे. इतकंच काय तर रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे. त्यामुळे इतकं सर्व होणं शक्य नाही त्यामुळे आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.