AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Points Table | राजस्थानच्या मोठ्या विजयानंतर गुणतालिकेत उलटफेर, मुंबईचं टेन्शन वाढलं कसे ते वाचा

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : आयपीएल 2023 स्पर्धेतील निम्म्याहून अधिक सामने झाले तरी गुणतालिकेतील प्लेऑफचं गणित काही सुटलेलं नाही. राजस्थानने कोलकात्याला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने दोन गुणांसह नेट रनरेटमध्ये मोठी झेप घेतली आहे.

IPL 2023 Points Table | राजस्थानच्या मोठ्या विजयानंतर गुणतालिकेत उलटफेर, मुंबईचं टेन्शन वाढलं कसे ते वाचा
राजस्थानच्या रॉयल विजय मुंबईच्या अंगाशी, गुणतालिका आणि नेट रनरेटमध्ये बसला असा फटका
| Updated on: May 11, 2023 | 11:32 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत प्लेऑफसाठी अजून एकाही संघाचं नाव निश्चित झालेलं नाही. राजस्थान रॉयल्सने कोलकात्याला 9 विकेट्स राखून पराभूत केलं आणि गुणतालिकेत मोठा फरक पडला आहे. इतकंच काय तर मुंबईसह लखनऊचं टेन्शन वाढलं आहे. कारण कोलकात्याने विजयासाठी दिलेल्या 150 धावांचं आव्हान राजस्थाननं 1 गडी गमवून 13.1 षटकातच पूर्ण केलं. यामुळे नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. पाचव्या स्थानावर राजस्थानने थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली. मुंबईचा नेट रनरेट कमी असल्याने 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे आता प्लेऑफसाठी जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे.

गुणतालिकेत गुजरात टायटन्स 16 गुणांसह पहिल्या स्थानी, चेन्नई सुपर किंग्स 15 गुणांसह दुसऱ्या स्थानी, राजस्थान 12 गुणांसह (0.633) तिसऱ्या स्थानी, मुंबई इंडियन्स 12 गुणांसह (-0.255) चौथ्या स्थानी, लखनऊ सुपर जायंट्स 11 गुणांसह पाचव्या स्थानी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 10 गुणांसह (-0.345) सहाव्या, कोलकाता 10 गुणांसह (-0.357) सातव्या, पंजाब 10 गुणांसह (-0.441) आठव्या, हैदाराबाद 8 गुणांसह नवव्या, दिल्ली 8 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

मुंबई इंडियन्सला आता गुणांसह नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे. मुंबईचे उर्वरित तीन सामने गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यासोबत आहेत. तिन्ही सामने मुंबई इंडियन्सने जिंकले तर 18 गुणांसह प्लेऑफमधलं स्थान निश्चित होईल.

मुंबई इंडियन्सचा तीन पैकी दोन सामने टॉप 5 मधल्या दोन संघांशी आहेत. त्यामुळे एक पराभवही गणित बिघडवू शकते. गुजरातला फक्त एक सामना जिंकायचा आहे. चेन्नईला दोन सामने आणि लखनऊ सुपर जायंट्सला तीन सामने जिंकायचे आहेत. तर त्यांचं प्लेऑफमधलं स्थान निश्चित होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सामना पावसामुळे रद्द झाल्याने प्रत्येकी एक गुण वाटून दिला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना फायदा झाला आहे. त्यामुळे मुंबईला काहीही करून तिन्ही सामने जिंकायचे आहे हे आता गुणतालिकेवरून सांगता येईल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?