AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Points Table | आता येणार खरी मजा! चेन्नईच्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये उलटफेर, पण… कोण टॉपला कोण बॉटमला? पाहा

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : पॉइंट टेबलमध्ये आता रस्सीखेच पाहायला मिळणार असून यामध्ये रनरेट महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये शेवटला क्वालिफाय होण्यासाठी सामन्यांच्या निकालावर काही संघांची एन्ट्री ठरू शकते.

IPL 2023 Points Table | आता येणार खरी मजा! चेन्नईच्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये उलटफेर, पण... कोण टॉपला कोण बॉटमला? पाहा
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 22, 2023 | 12:09 AM
Share

मुंबई : सीएसके संघाने हैदराबादवर सात विकेट्सने विजय मिळवलेला आहे. या विजयासह दोन गुणांची कमाई करत आपलं पॉइंट टेबलमधील स्थानही आणखी भक्कम केलं आहे. मात्र आता पॉइंट टेबलमध्ये पहिल्या तीन संघाचे गुण आणि त्याखालोखाल असलेल्या संघाचे गुण हे समान आहेत. त्यामुळे आता रस्सीखेच पाहायला मिळणार असून यामध्ये रनरेट महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये शेवटला क्वालिफाय होण्यासाठी सामन्यांचे निकालावर काही संघांची एन्ट्री ठरणार आहे.

पॉइंट टेबलमध्ये पाहिलं तर आता पहिल्या स्थानावर राजस्थान रॉयल्स हा संघ आहे. तर दुसऱ्या स्थानी लखनऊ सुपर जायंट्स आणि तिसऱ्या स्थानावर आता चेन्नई सुपर किंग्सने उडी घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही संघांचे गुण आठ आहेत.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

यानंतर चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या या स्थानावर गुजरात, आरसीबी, मुंबई आणि पंजाब अनुक्रमे हे संघ आहेत. या चारही संघांचे गुण हे 6 आहेत. आठव्या स्थानावर केकेआर, नवव्या स्थानी हैदराबाद हे संघ 4 गुणांसह आहेत. तळाला दिल्ली कॅपिटल्स संघ 2 गुणांसह आहे. त्यामुळे आता क्वालिफाय करण्यासाठी सामने जिंकण्यासोबतच रन रेटवरही लक्ष ठेवता आलं पाहजे. नाहीतर गुण समान आहेत आणि फक्त रन रेट कमी असल्यामुळे क्वालिफाय होता आलं नाही, असं झालं तर नवल वाटायला नको.

आजच्या सामन्याचा धावता आढावा

प्रथम फलंदाजी करताना सनराइजर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकात 134 धावा केल्या आहेत. हैदराबादच्या संघाच्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. तर जडेजाने चेन्नईकडून 3 विकेट्स घेतल्या.

हैदराबाद संघाच्या 135 धावांचा पाठलाग करताना सीएसकेने 3 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण केलं. एकतर्फी सामन्यामध्ये डेव्हॉन कॉनवे याने सर्वाधिक नाबाद 77 धावांची खेळी केली. त्यासोबतच ऋतुराज गायकवाड यानेही 35 धावा केल्या. हैदराबादच्या मयंक मार्कंडे याने घेतलेल्या 2 विकेट्स सोडता इतर कोणत्याही गोलंदाजाला यश मिळवता आलं नाही.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), महेश तीक्ष्णा, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक

Follow Us
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...