IPL 2024 Points Table: पंजाबने कोलकात्याला पराभूत केल्याने मुंबई इंडियन्सला दणका, कसं ते समजून घ्या

| Updated on: Apr 26, 2024 | 11:54 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 42 वा सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकात्याने पंजाब किंग्सला धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं गणित काही अंशी सोपं झालं आहे.

IPL 2024 Points Table: पंजाबने कोलकात्याला पराभूत केल्याने मुंबई इंडियन्सला दणका, कसं ते समजून घ्या
Follow us on

प्लेऑफची शर्यत शेवटच्या टप्प्यात चुरशीची होताना दिसत आहे. पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केल्यानं पॉइंट टेबलमध्ये चुरस वाढली आहे. कारण आता पंजाब किंग्सच्याही प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. पंजाब किंग्सने 6 गुणांसह आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे उर्वरित पाच सामन्याचं गणित पाहता पंजाबला टॉप 4 मध्ये स्थान मिळवणं कठीण नाही. पंजाब किंग्सचे आता 6 गुण असून पाच सामन्यात 10 गुण कमवण्याची संधी आहे. 10 गुण मिळवल्यास 16 गुणांसह पंजाबचा संघ टॉप 4 मध्ये स्थान मिळवेल. तर मुंबई इंडियन्सला पुढच्या सामन्यात काहीही करून विजय मिळवत जावा लागणार आहे. अन्यथा मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित खूपच किचकट होईल. कोलकात्याचा संघ दुसऱ्याच स्थानावर आहे. पण त्याच्या नेट रनरेटवर परिणाम झाला आहे.

राजस्थान रायल्स संघ आठ पैकी सात सामने जिंकत टॉपला आहे. 14 गुण आणि 0.698 नेट रनरेटसह पहिल्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 10 गुण आणि 0.972 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर, सनरायझर्स हैदराबाद 10 गुण आणि 0.627 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर, लखनौ सुपर जायंट्स 10 गुण आणि 0.148 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर, चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.415 नेट रनरेटसह पाचव्या, दिल्ली कॅपिटल्स 8 गुण आणि -0.386 नेट रनरेटसह सहाव्या, गुजरात टायटन्स 8 गुण आणि -0.974 नेट रनरेटसह सातव्या, पंजाब किंग्स 6 गुण आणि -0.187 नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.227 नेट रनरेटसह नवव्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 4 गुण आणि -0.765 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामना रोमांचक झाला. कोलकात्याने विजयासाठी दिलेल्या 262 धावांचं आव्हान गाठणं कठीण होतं. पण पंजाब किंग्सने हे अशक्यप्राय आव्हान गाठून दाखवलं. पंजाब किंग्सने 18.4 षटकात 2 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. या सामन्यात जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूत नाबाद 108 धावा, तर शशांक सिंगने 28 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या आणि विजय मिळवला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.