IPL 2024 Purple Cap : युझवेंद्र चहल याच्याकडेच पर्पल कॅप, शर्यतीत कोण?

| Updated on: Apr 16, 2024 | 11:53 PM

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहल याच्याकडे आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 31 व्या सामन्यानंतर पर्पल कॅप आहे. तर टॉप 5 मध्ये कोण आहे? जाणून घ्या.

IPL 2024 Purple Cap : युझवेंद्र चहल याच्याकडेच पर्पल कॅप, शर्यतीत कोण?
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 31 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकला. केकेआरने विजयासाठी दिलेल्या 224 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने आव्हान शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. जॉस बटलर हा राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बटलरने नाबाद 107 धावांची खेळी केली. राजस्थानने अशाप्रकारे हा सामना 2 विकेट्सने जिंकला. राजस्थानचा हा सहाव्या सामन्यातील पाचवा विजय ठरला. या सामन्यानंतर पर्पल कॅप कुणाकडे आहे? पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये कोण आहे? हे आपण जाणून घेऊयात. आयपीएल स्पर्धेत आणि स्पर्धेदरम्यान सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते.

युझवेंद्र चहल याच्याकडेच पर्पल कॅप

राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहल याच्याकडेच पर्पल कॅप कायम आहे. चहलने कोलकाता विरुद्धच्या या सामन्यात एक विकेट घेतली. चहलने या विकेटसह अव्वल स्थान आणखी भक्कम केलं. चहलच्या नावावर आता एकूण 12 विकेट्स झाल्या आहेत. चहलने 7 सामन्यांमध्ये 8.34 च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याशिवाय दुसऱ्या ते पाचव्या स्थानी अनुक्रमे जसप्रीत बुमराह, मुस्तफिजुर रहमान, पॅट कमिन्स आणि कगिसो रबाडा विराजमान आहेत. मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह याने 6 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या मुस्तफिजुर रहमान याने 5 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स 6 सामन्यात 9 विकेट्ससह चौथ्या स्थानी आहे. तर पंजाबच्या कगिसो रबाडा याच्या नावावर 6 सामन्यात 9 विकेट्स आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.