IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण अव्वल स्थानी? लखनौ चेन्नई सामन्यानंतर असा पडला फरक

| Updated on: Apr 19, 2024 | 11:59 PM

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : पर्पल कॅपची शर्यत आता आणखी रंगतदार वळणावर आली आहे. टॉप 5 मधील गोलंदाजांच्या विकेट्समध्ये फक्त 2 ते 3 विकेट्सचा फरक आहे. पण हा फरक टी20 मध्ये खूप मोठा असतो हे सांगायला नको.

IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण अव्वल स्थानी? लखनौ चेन्नई सामन्यानंतर असा पडला फरक
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत पर्पल कॅपसाठीची शर्यत एकदम रंगतदार असते. कारण एक विकेट घेणं टी20 फॉर्मेट किती कठीण असतं याचा अंदाज सर्वांनाच आहे. त्यामुळे पर्पल कॅपच्या शर्यतीत राहणं ही मोठी गोष्ट आहे. आयपीएलमध्ये 34 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्ने चेन्नई सुपर किंग्सचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. मथीशा पथीराना आणि मुस्तफिझुर रहमान यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आलं. त्यामुळे पर्पल कॅपच्या शर्यतीत तशी काही मोठी उलथापालथ झाली नाही. मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह 13 विकेटसह अव्वल स्थानी आहे. तर युझवेंद्र चहल आणि गेराल्ड कोएत्झी 12 विकेटसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. मुस्तफिझुर रहमानला आजच्या सामन्यात काही खास करता आलं नाही. त्यामुळे एकच विकेट मिळाल्याने 11 गडी झाले आहेत. त्यामुळे चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमद 10 विकेटसह पाचव्या स्थानी आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 176 धावा केल्या. यात अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, मोईन अली आणि महेंद्रसिंह धोनीने चांगली कामगिरी केली. या व्यतिरिक्त कोणही टीकू शकलं नाही. त्यामुळे फक्त 177 धावांचं आव्हान लखनौ सुपर जायंट्ससमोर आलं. हे आव्हान क्विंटन डीकॉक आणि केएल राहुल यांनी सोपं केलं. पहिल्या गड्यासाठी 134 धावांची भागीदारी केली आणि विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. क्विंटन डीकॉक बाद झाल्यानंतर केएल राहुलने निकोलस पूरनसह मोर्चा सांभाळला. केएल राहुल 82 धावा करून बाद झाला. त्यानंतर पूरन आणि स्टोइनिसने विजयी धावा पूर्ण केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.