AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRE vs IND : आयर्लंड-भारत टी 20I मालिकेसाठी नव्या कर्णधाराचं नाव जाहीर, 6 खेळाडू सीरिजमधून आऊट

Ireland Squad For T20i Series Against India 2026 : आयर्लंडने मायदेशात टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या टी 20i मालिकेसाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आयर्लंड या मालिकेत नव्या कर्णधारासह टीम इंडिया विरुद्ध 2 हात करणार आहे. जाणून घ्या.

IRE vs IND : आयर्लंड-भारत टी 20I मालिकेसाठी नव्या कर्णधाराचं नाव जाहीर, 6 खेळाडू सीरिजमधून आऊट
India vs IrelandImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 22, 2026 | 9:30 PM
Share

टीम इंडियाने अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यानंतर वनडे सीरिजमध्येही क्लिन स्वीप केलं. भारताने अफगाणिस्तानला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर (India Tour Of Ireland 2026) जाणार आहे. टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात एकूण 2 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. श्रेयस या मालिकेतून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. या मालिकेला 26 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी या मालिकेसाठी यजमान आयर्लंडने टीम जाहीर केली आहे.

आयर्लंडने या मालिकेसाठी नव्या कर्णधाराची नियुक्ती केली आहे. लॉर्कन टकर याला आयर्लंड टी 20i संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. टकरने कर्णधार म्हणून अनुभवी फंलदाज पॉल स्टर्लिंग याची जागा घेतली आहे. पॉल दुखापतीमुळे या मालिकेत निवडीसाठी उपलब्ध नव्हता. तसेच पॉलसह एकूण 6 खेळाडूंची दुखापतीमुळे या मालिकेत निवड करण्यात आलेली नाही.

लॉर्कन टकरबाबत थोडक्यात

लॉर्कन एका दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. लॉर्कनने 2016 साली पदार्पण केलं होतं. लॉर्कनने आतापर्यंत 91 टी 20I सामन्यांमध्ये 1 हजार 730 धावा केल्या आहेत. तसेच लॉर्कनने 25 एकदिवसीय आणि 10 कसोटी सामन्यांमध्ये आयर्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.

आयर्लंड संघात भारतीय वंशाच्या जय मूंद्रा याची निवड करण्यात आलीय. जयला मॅथ्यू होलार्ड याच्या जागी स्थान देण्यात आलं आहे. रियूब विल्सन याला पहिल्यांदाच टी 20i क्रिकेट संघात स्थान देण्यात आलं आहे.

आयर्लंड विरुद्ध भारत टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 26 जून, बेलफास्ट, संध्याकाळी 6 वाजता

दुसरा सामना, 28 जून, बेलफास्ट, संध्याकाळी 6 वाजता

आयर्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : श्रेयस अय्यर (कॅप्टन), ईशान किशन, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, प्रिंस यादव आणि वैभव सूर्यवंशी.

टी 20I मालिकेसाठी आयर्लंड टीम : लॉर्कन टकर (कॅप्टन), रॉस एडेयर, बेन काल्टिज, गेरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहनी, मॅथ्यू हंप्रीज, गेविन हॉय, मॅथ्यू होलार्ड, लियम मॅकार्थी, जय मूंद्रा, हॅरी टॅक्टर, टीम टॅक्टर आणि रियूबेन विल्सन.

Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष