MI vs SRH : पराभवानंतर इरफान पठाणचे हार्दिक पांड्याबद्दल जिव्हारी लागणारे शब्द

| Updated on: Mar 28, 2024 | 11:57 AM

SRH टीमने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक 277 धावा केल्या. मुंबईने या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा चांगला प्रयत्न केला. अनेक प्रसंगी अपेक्षा उंचावल्या. पण एवढ्या मोठ्या लक्ष्यासमोर मुंबईची टीम 31 धावांनी कमी पडली.

MI vs SRH : पराभवानंतर इरफान पठाणचे हार्दिक पांड्याबद्दल जिव्हारी लागणारे शब्द
Hardik pandya-Irfan Pathan
Follow us on

मुंबई इंडियन्सच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर हार्दिक पांड्या सर्वांच्या रडारवर आला आहे. हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवल्यापासून अनेकांच्या मनात राग आहे. आता सलग दोन पराभव झाल्यानंतर या रागाला वाट मोकळी करुन दिली जातेय. मैदानातील हार्दिक पांड्याच्या चुकीच्या निर्णयांवर बोट ठेवल जातय. काल सनरायजर्स हैदराबाद टीमने मुंबई इंडियन्स विरुद्ध धावांचा डोंगर उभा केला. SRH टीमने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक 277 धावा केल्या. मुंबईने या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा चांगला प्रयत्न केला. अनेक प्रसंगी अपेक्षा उंचावल्या. पण एवढ्या मोठ्या लक्ष्यासमोर मुंबईची टीम 31 धावांनी कमी पडली. मुंबई इंडियन्सला 5 बाद 246 धावांपर्यंत मजला मारता आली.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण नेहमीच हार्दिक पांड्यावर टीका करत असतो. स्टुडिओ असो किंवा सोशल मीडिया हार्दिक पांड्याला टार्गेट करण्याची तो एकही संधी सोडत नाही. हार्दिक पांड्याला टीम इंडियाच कॅप्टन घोषित केलं, तेव्हा सुद्धा त्याने पांड्याच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आता SRH कडून दारुण पराभव झाल्यानंतर इरफान पठानने पांड्याला लक्ष्य केलय.


कॅप्टन 120 च्या स्ट्राइक रेटने तरी बॅटिंग करु शकत नाही का?

हार्दिक पांड्याची कॅप्टनसी खूपच सामान्य आहे. संहार सुरु असताना जसप्रीत बुमराहला लांब ठेवण हे समजण्यापलीकडे आहे असं इरफान पठाणने म्हटलय. जर सगळी टीम 200 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतेय, तर कॅप्टन 120 च्या स्ट्राइक रेटने तरी बॅटिंग करु शकत नाही का? असा प्रश्न इरफान पठाणने उपस्थित केलाय. मुंबई इंडियन्सच्या या पराभवासाठी हार्दिक पांड्याच्या चुकीच्या रणनितीला जबाबदार धरल जातय.