IND vs AUS Final | शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या फायनलच निमंत्रण दिलं नव्हतं का?
IND vs AUS Final | टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करुन सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. फायनलला अनेक मान्यवर उपस्थित होते. सेलिब्रिटींबरोबर बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी, राजकीय नेते हजर होते. पण महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता दिसला नाही.
IND vs AUS Final (संदीप राजगोळकर) | भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रविवारी वनडे वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सामन्याला उपस्थित होते. फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर आता यावरुन राजकारण सुरु झालं आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अहमदाबादऐवजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर फायनलचा सामना व्हायला पाहिजे होता, असं मत व्यक्त केलं. सोशल मीडियावर अहमदाबादच्या प्रेक्षकांमुळे टीम इंडियाने सामना गमावला अशी चर्चा रंगली होती. कारण स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांनी घोषणा दिल्या नाहीत, आरडाओरडा केला नाही. भारतीय संघाच्या कामगिरीत घसरण होत असताना सन्नाटा होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच काम अधिक सोपं झालं.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याच निमंत्रण नसल्याची माहिती समोर आलीय. शरद पवार हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष होते. शरद पवार यांनी बीसीसीआय आणि आयसीसीचं अध्यक्ष पद भूषवले असल्याने त्यांना निमंत्रण देणं अपेक्षित होते. पण शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या फायनलचे निमंत्रण नव्हते, विश्वसनीय नेत्याने ही माहिती दिलीय. शरद पवार, कपिल देव यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी बरच योगदान दिलय. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.
सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला
वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेटने पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या. या लक्ष्याचा ऑस्ट्रेलियाने आरामात पाठलाग केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. तेच टीम इंडियाच तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न भंग पावलं. टीम इंडियाने 1983 आणि 2011 असं दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.