
मुंबई इंडियन्सचा विकेटकीपर ओपनर बॅट्समन ईशान किशन याने वानखेडे स्टेडियममध्ये आरसीबी विरुद्ध विजयी आव्हानाचा पाठलगा करताना विस्फोटक खेळी केली आहे. ईशानने अवघ्या 23 बॉलमध्ये आयपीएलच्या कारकीर्दीतील 16 वं अर्धशतक ठोकलं. ईशान किशन याने या अर्धशतकादरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी करत गगनचुंबी शॉट मारले. तसेच आरसीबीच्या गोलंदांजांच्या चिंढड्या चिंढड्या केल्या. तसेच रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सला वादळी सुरुवात करुन दिली. ईशान किशन याने 217.39 च्या स्ट्राईक रेटने 5 चौकार आणि 6 षटकार ठोकले. अर्थात ईशानने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 9 बॉलमध्ये 44 धावा ठोकल्या.
आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 197 धावांचा पाठलाग करताना रोहित आणि ईशान या जोडीने वादळी सुरुवात केली. ईशानचा धावा करण्याचा वेग पाहून रोहितने त्याला अधिक संधी दिली. ईशानने त्याचा फायदा घेत दे दणादण फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं. ईशानने अर्धशतकानंतर टॉप गिअर टाकला. ईशानचा झंझावात पाहून तो शतक ठोकणार असंच वाटत होतं. मात्र आकाश दीप याने ईशानला रोखलं. आकाशने ईशानला 69 धावांवर रोखलं. विराटने ईशानचा कॅच घेतला. ईशानने 34 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 7 फोरसह 202.94 च्या स्ट्राईक रेटने 69 धावांची खेळी केली.
दरम्यान रोहित आणि ईशान या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. या दोघांनी 8.5 ओव्हरमध्ये या 101 धावा केल्या. ईशान 69 धावांवर आऊट होत त्याने मुंबईच्या विजयाचा पाया यशस्वीरित्या रचला. आता मुंबईच्या विजयाची जबाबदारी इतर फलंदाजांवर असणार आहे.
ईशानची तडाखेदार खेळी
Ishan Kishan & Rohit Sharma are on the charge 💥#MI off to a strong start, 72/0 in the Powerplay 🙌
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/0d1ZtS49Ht
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.