AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan Kishan IPL 2022 Auction: इशानसाठी कायपण, मुंबई तिघांना भिडली, अखेर 15.25 कोटींना घेतलं विकत

Ishan Kishan Auction Price:

Ishan Kishan IPL 2022 Auction: इशानसाठी कायपण, मुंबई तिघांना भिडली, अखेर 15.25 कोटींना घेतलं विकत
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 4:59 PM
Share

मुंबई: इशान किशन (Ishan kishan) आजच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) तब्बल 15.25 कोटी रुपयांची बोली लावून इशान किशनला विकत घेतलं. याआधी मुंबईचाच श्रेयस अय्यर (Shreyas iyer) सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला कोलकाता नाइट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. इशान किशनला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबईने आपली पूर्ण आर्थिक ताकत पणाला लावली. याआधी मुंबईने कुठल्याही खेळाडूसाठी 10 कोटी पर्यंत रक्कम खर्च केली नव्हती. रोहित शर्मासाठी मुंबईने याआधी सर्वाधिक रक्कम खर्च केली होती.

पंजाब, SRH आणि गुजरातशी झाली टक्कर लगेच इशानचा भाव सहा कोटीपर्यंत गेला. त्यानंतर गुजरात टायटन्सने बोली लावली व इशानची किंमत थेट 10 कोटीच्या घरात गेली. त्यानंतर हैदराबादचा संघ बोलीमध्ये उतरला. मुंबई आणि हैदराबादमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळाली. अखरे मुंबईनेच बाजी मारली. इशान किशन 2018 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.

सामना फिरवण्याची क्षमता इशान एक युवा प्रतिभावान डावखुरा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने अनेक सामन्यांमध्ये आपल्या बॅटची चमक दाखवली आहे. अत्यंत सहजतेने तो चौकार, षटकार लगावू शकतो. स्वबळावर त्याने अनेकदा मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सामन्याचा नूर पालटण्याची क्षमता त्याच्या फलंदाजीमध्ये आहे. त्यामुळे मुंबईने काहीही करुन इशान किशनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी आर्थिक ताकत पणाला लावली. मुंबईने ज्या चार खेळाडूंना रिटेन केलय, त्यामध्ये इशान किशन नव्हता. इशानची बेस प्राइस दोन कोटी रुपये होती. इशानच्या समावेशामुळे मुंबईचा संघाची ताकत निश्चित वाढणार आहे.

1452 धावा इशान किशन विकेटकिपिंगचे कौशल्य असलेला डावखुरा फलंदाज आहे. आतापर्यंत चार सीजमध्ये त्याने 136.33 च्या सरासरीने 1452 धावा केल्या आहेत. 2020 मध्ये मुंबईच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने 516 धावा केल्या होत्या. 2018 पासून इशान किशन मुंबईकडून खेळतोय. त्याला 5.5 कोटींना विकत घेतलं होतं. मुंबईकडून खेळताना त्याने दोनदा विजेतेपदाची चव चाखली आहे. भविष्याचा विचार करता त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.