AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईशांत शर्मा याने कर्णधार धोनी याच्याबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाला “मैदानात..”

भारतीय क्रिकेट इतिहासात महेंद्रसिंह धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून गणला जातो. कठीण परिस्थितीत संघाला महेंद्रसिंह धोनीचं शांतपणे मार्गदर्शन लाभलं. पण ईशांत शर्माने धक्कादायक खुलासा केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

ईशांत शर्मा याने कर्णधार धोनी याच्याबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाला मैदानात..
ईशांत शर्मा याने महेंद्रसिंह धोनी याचं पितळ केलं उघडं, स्पष्टच सांगितलं की...
| Updated on: Jun 26, 2023 | 6:43 PM
Share

मुंबई : आयसीसी स्पर्धेत भारतीय संघांनं महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. टी 20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली आहे. महेंद्रसिंह धोनीची छबी कॅप्टन कूल म्हणून सर्वश्रूत आहे. संघ कठीण परिस्थितीत असताना शांतपणे स्थिती हाताळण्याची कसोटी धोनीकडे असल्याचं सांगितलं जातं. धोनीच्या चेहऱ्यावर कोणतीही रिअॅक्शन पाहायला मिळत नसल्याचं कॅमेऱ्यात टिपलं गेलं आहे. पण जेव्हा कॅमेऱ्याची नजर त्याच्यावरून हटते तेव्हा खेळाडूंना त्याचं रौद्ररूप पाहायला मिळतं असा खुलासा ईशांत शर्मा याने केला आहे. माही मैदानावर खेळाडूंना कशाचीही पर्वा न करता शिव्या देतो असं त्याने सांगितलं आहे.

काय सांगितलं ईशांत शर्मा याने

एका यूट्यूब पॉडकॉस्टवर धोनीच्या सिक्स सेंसबाबत ईशांत शर्माला प्रश्न विचारला गेला. धोनी शांतपणे स्थिती हाताळतो? याबाबत काय सांगशील. तेव्हा ईशांत शर्मा याने दिलेलं उत्तर ऐकून भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. धोनीचा स्वभाव शांत नसल्याचं त्याने यावेळी सांगितलं. इतकंच काय धोनी कोणत्याच बाबतीत शांत नसून मैदानावर शिव्यांची लाखोली वाहतो.

“धोनीची स्ट्रेंथ खूप साऱ्या आहेत. तो शांत आणि कूल अजिबात नाही. मैदानात तो शिव्यांची लाखोली वाहतो. मला तर खूप साऱ्या शिव्या दिल्या आहेत. मी हे मस्करीत सांगत आहे. पण छोट्या भावाच्या नात्याने त्याने मला समजावलं आहे. मी त्याला एकदा विचारलं की, तू माझ्यावर इतका का चिडतो? तर त्याने सांगितलं की मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच राग व्यक्त करतो. मी प्रत्येकावर चिडत नाही. तेव्हा मी बोललो मला नव्हतं माहित. त्यानंतर मी एकदम चिल्ल झालो.”, असं ईशांत शर्मा याने सांगितलं.

“माहीसोबत मी आयपीएल खेळलो आहे. तो गोलंदाजांच्या मीटिंगमध्ये येत नाही. तो सांगतो की ते तुमचं काम आहे. जे मैदानात करायचं आहे ते मी करतो. परिस्थिती आणि विकेट काही वेगळंही सांगू शकते. यासाठी तुम्ही तयार असू शकत नाही. अशा परिस्थितीला खुलेपणाने सामोरं जावं लागतं. विकेट आणि परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात.”, असंही ईशांत शर्मा याने पुढे सांगितलं.

ईशांत शर्मा क्रिकेट कारकिर्द

ईशांत शर्मा 105 कसोटी, 80 वनडे, 14 टी 20 आणि 101 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत 311, वनडेत 115. टी 20 मध्ये 8 आणि आयपीएल 82 गडी बाद केले आहेत. कसोटी कारकिर्दीत त्याने एकमेव अर्धशतक ठोकलं आहे.

Follow Us
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?