AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wasim Jaffer: ‘तुमच्या स्मिथपेक्षा आमच्या सैनीचा अ‍ॅव्हरेज जास्त’, वसीम जाफरचं ऑस्ट्रेलियन मीडियाला जोरदार प्रत्युत्तर

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला त्याच्या फॉर्मवरुन लक्ष्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मीडिया चॅनल 7 क्रिकेटला भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Wasim Jaffer: 'तुमच्या स्मिथपेक्षा आमच्या सैनीचा अ‍ॅव्हरेज जास्त', वसीम जाफरचं ऑस्ट्रेलियन मीडियाला जोरदार प्रत्युत्तर
वसिम जाफर
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 6:10 PM
Share

मेलबर्न: भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला त्याच्या फॉर्मवरुन लक्ष्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मीडिया चॅनल 7 क्रिकेटला भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 2021 मध्ये विराट कोहलीने विशेष कामगिरी केली नाही. त्याने 11 कसोटी सामन्यात 536 धावा केल्या. यात चार अर्धशतकांचा समावेश होता. त्याची सरासरी खूपच कमी 28.21 होती. त्याची एकूण सरासरी 50 पेक्षा जास्त राहिली आहे. याकडे चॅनल 7 ने लक्ष वेधलं. (Jaffer fires back at Australian media’s stat of the day dig directed at Kohli)

7 क्रिकेटने एक टि्वट केलं. यात त्यांनी वर्ष 2019 सुरु झाल्यापासून कसोटीमध्ये कोहलीची सरासरी 37.17 असल्याचं सांगितलं. या काळात मिचेल स्टार्कची सरासरी कोहलीपेक्षा जास्त आहे. स्टार्कची सरासरी 38.63 आहे. स्टार्क आणि कोहलीचा फोटो पोस्ट करुन 7 क्रिकेटने हे टि्वट केले. विराट कोहलीची खिल्ली उडवणाऱ्या या टि्वटला वसीम जाफरने सुद्धा त्याच स्टाइलने जोरदार प्रत्युत्तर दिलं.

वसीम जाफरने त्याच्या टि्वटमध्ये ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज स्टीव्ह स्मिथची नवदीप सैनी बरोबर तुलना केली. वनडे करीयरमध्ये नवदीप सैनीची फलंदाजीची सरासरी 53.50 आहे. तेच स्मिथची सरासरी 43.34 आहे असे जाफरने टि्वटमध्ये म्हटले आहे. सैनीची फलंदाजीची सरासरी स्मिथपेक्षा खरोखर जास्त आहे का? सध्याच्याघडीला पाच वनडे सामन्यांमध्ये सैनीने 107 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्ध 45 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

सैनी तीन वेळा नाबाद राहिला. त्यामुळे त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. वनडेमध्ये त्याचा स्ट्राइकरेट 80 आहे. दुसऱ्याबाजूला स्मिथने 128 वनडेमध्ये 43.34 च्या सरासरीने 4300 धावा केल्या आहेत. कोहलीला डिवचणाऱ्या ऑस्ट्रेलियन मीडियाला जाफरने त्याच्या स्टाइलमध्ये जिव्हारी लागणार उत्तर दिलं आहे.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.