पठ्ठ्याने टीम इंडियाला लोळवलं, मैदानात येताच भलेभले गार, आता शोधतोय नोकरी; दिग्गज गोलंदाज नेमका कोण?

सध्या जय मुंदडा याच्या प्रोफाईलवर ओपन फॉर वर्क असे लिहिलेले आहे. म्हणजेच तो सध्या नोकरीच्या शोधात आहे, असे म्हटले जातेय. आपल्या LinkedIn प्रोफाईलवर त्याने शिक्षण त्याचबरोबर कंपनीतील पद आणि त्याच्याकडे असलेले कौशल्य याची सगळी माहिती दिलेली आहे.

पठ्ठ्याने टीम इंडियाला लोळवलं, मैदानात येताच भलेभले गार, आता शोधतोय नोकरी; दिग्गज गोलंदाज नेमका कोण?
jay mundada cricketer
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2026 | 3:47 PM

Jay Mundada : भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. ते मैदानावर उतरले की धावांचा चक्क पाऊस पडतो. परंतु एका गोलंदाजापुढे भारताची संपूर्ण टीमच कोलमडली. नुकतेच भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची t20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली गेली. या मालिकेत आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंदडा याने कमालच केली. त्याच्या गोलंदाजीपुढे भारताच्या दिग्गज फलंदाजांनी हात टेकले. दरम्यान मैदान गाजवणारा हाच जय मुंदडा आता नोकरीच्या शोधात आहे. त्याची LinkedIn प्रोफाइल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जय मुंदडा कोण आहे?

जय मुंदडा या खेळाडूने आयर्लंड संघाकडून दमदार कामगिरी केली. त्याने भारतासोबतच्या दोन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामन्यात पाच बळी घेतले. दुसऱ्या t20 सामन्यात तर त्याने कमालच केली. भारताकडून सलामीला आलेले संजू सॅमसंन आणि अभिषेक शर्मा या दोन दिग्गज खेळाडूंना त्याने शून्यावर बाद केले. त्यानंतर भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर हा देखील त्याच्या गोलंदाजी पुढे जास्त काळ टिकू शकला नाही श्रेयस. फक्त दहाच धावा करू शकला. याच कामगिरीमुळे जय मुंदडाची क्रिकेट रसिकांनी वाहवा केली.

जय मुंदडा आता व्हायरल का होतोय?

जय मुंदडा याचा जन्म राजस्थानमध्ये झाला. 2021 आली त्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या शाखेत पदव्युत्तर पदवी मिळवली. हे शिक्षण घेण्यासाठी तो आयर्लंडला गेला होता. विशेष म्हणजे त्याने क्रिकेटमध्ये आयर्लंड संघाचे प्रतिनिधित्व केलेले असले तरी त्याच्याकडे अजूनही भारताचाच पासपोर्ट आहे. 2022 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने लगेच intel या टेक कंपनीत नोकरीला सुरुवात केली. या कंपनीमध्ये तो प्रोजेक्ट डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्याच्या LinkedIn प्रोफाइलनुसार 2025 साली त्याने ही नोकरी सोडली. या नोकरीनंतर त्याने कुठेही नोकरी केलेली नाही.

LinkedIn प्रोफाईलवर नेमकं काय लिहिलेलं आहे?

सध्या जय मुंदडा याच्या प्रोफाईलवर ओपन फॉर वर्क असे लिहिलेले आहे. म्हणजेच तो सध्या नोकरीच्या शोधात आहे, असे म्हटले जातेय. आपल्या LinkedIn प्रोफाईलवर त्याने शिक्षण त्याचबरोबर कंपनीतील पद आणि त्याच्याकडे असलेले कौशल्य याची सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात नाव कमावणारा जय मुंदडा आता आयटीमध्ये नोकरी करणार की क्रिकेटमध्येच आपल्या करिअर पुढे नेणार असे विचारले जात आहे.

Follow Us