AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही इंग्लंडविरद्ध वैभवला संधी नाहीच? टीम इंडियाच्या कोचच्या विधानाने खळबळ

भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघावर अनेक टीका झाल्या. भारतीय संघाने पहिला सामना गमावूनही वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या सामन्यात का खेळवले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता त्यावर भारतीय संघाच्या कोचने एक विधान केले आहे.

Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही इंग्लंडविरद्ध वैभवला संधी नाहीच? टीम इंडियाच्या कोचच्या विधानाने खळबळ
vaibhav sooryavanshi
| Updated on: Jun 29, 2026 | 1:50 PM
Share

भारत आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका पार पडली ज्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघावर अनेक टीका झाल्या. बेलफास्टमध्ये खेळलेले दोन्ही टी-20 सामने जिंकून आयर्लंडने टीम इंडियाला क्लीन स्वीप दिला. आयर्लंडविरुद्ध सामना किंवा मालिका गमावण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे, वैभव सूर्यवंशीला मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. भारत-आयर्लंड मालिकेसाठी त्याच्या नावाचा जोरदार प्रचार करण्यात आला होता, पण सूर्यवंशी बेंचवरच बसून राहिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आयर्लंडविरुद्ध पराभव होऊनही, टीम इंडियाने वैभवला सध्या तरी संधी दिली नाही. आता यानंतर भारतीय संघाचे असिस्टंट कोच रायन टेन डोशेट काय म्हणाले?

आयर्लंडविरुद्धच्या सनसनाटी पराभवानंतर रायन टेन डोशेट यांनी सांगितले की, वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे, पण त्याला संधीची वाट पाहावी लागेल. वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, पण तुम्ही संजू सॅमसनला वगळू शकत नाही. विश्वचषक जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आम्हाला खेळाडूंना अधिक संधी द्यायची आहे. वैभव सूर्यवंशीला आपल्या संधीसाठी वाट पाहावी लागेल.”

भारताला आता इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. पहिला सामना 1 जुलै रोजी होणार असून, या सामन्यातही वैभवला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांची जोडी आयर्लंडमध्ये अपयशी ठरली असली तरी, त्यांच्या कामगिरीचा हवाला देत टीम इंडिया त्यांना अधिक संधी देण्यास कटिबद्ध आहे. सलामीची जोडी म्हणून या दोन्ही खेळाडूंची कामगिरी खराब झाली आहे.

टीम इंडियाकडे अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यामुळे वैभव सूर्यवंशीला वाट पाहावी लागेल. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तो एक सलामीवीर आहे आणि अभिषेक शर्मा व संजू सॅमसनसारख्या खेळाडूंशी स्पर्धा करत आहे. अभिषेक शर्मा हा जगातील नंबर 1 टी-20 फलंदाज आहे आणि सॅमसनने टी-20 विश्वचषक जिंकला आहे. सूर्यवंशी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध पाच टी20 सामने आहेत. त्याला यापैकी एका सामन्यात नक्कीच संधी मिळेल. आता तो कोणता सामना असेल हे पाहणे बाकी आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...