Video : जसप्रीत बुमराह टाकत असलेल्या चेंडूची चर्चा, या रणनितीने घेतले 12 विकेट

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने तीन विकेट घेतल्या. यापैकी दोन विकेटची चर्चा खास चेंडूमुळे रंगली आहे.

Video : जसप्रीत बुमराह टाकत असलेल्या चेंडूची चर्चा, या रणनितीने घेतले 12 विकेट
Video : जसप्रीत बुमराह टाकत असलेल्या चेंडूची चर्चा, या रणनितीने घेतले 12 विकेट
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 02, 2025 | 3:31 PM

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा दिसून आला. वेस्ट इंडिजचा संघ फक्त 44.1 षटकं खेळू शकला आणि 162 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी विकेट काढल्या. जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 42 धावा देत 3 गडी बाद केले. या तीन विकेटपैकी दोन विकेट या खास होत्या. कारण जसप्रीत बुमराह टाकत असलेल्या चेंडूची फलंदाजांमध्ये दहशत आहे. जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजचे दोन विकेट यॉर्कर चेंडूवर काढले. त्याला आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज जॉन कॅम्पबेलला ध्रुव जुरेलच्या हाती झेल देत बाद केलं. पण त्यानंतर जस्टिन ग्रीव्ह्स आणि जोहान लाएनची विकेट क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरली. या दोन्ही विकेट त्याने यॉर्करवर काढल्या. फलंदाजांची ऑफ स्टंप घेऊन गेल्या.

जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्ध 39 वं षटक टाकले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जस्टिन ग्रीव्हजला यॉर्कर टाकत क्लीन बोल्ड केलं. बुमराहचा चेंडू ऑफ-स्टंपच्या स्टंपवर घुसला आणि विकेट घेऊन गेला. ग्रीव्हजला चेंडूकडे पाहण्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता. त्यानंतर जसप्रीत बुमराहने 41 वे षटक टाकले. या षटकाचा पहिला चेंडू जोहान लाएनला यॉर्कर टाकला. परफेक्ट यॉर्कर त्याचा मधला स्टंप घेऊन गेला. जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये यॉर्कर टाकतो. पण कसोटीतही या चेंडूचा वापर करत आहे. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 198 वेळा यॉर्कर चेंडू टाकला आहे. यात 77 धावा देत 7 च्या सरासरीने 12 विकेट काढल्या आहेत.

दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने भारतात खेळलेल्या कसोटीत विकेटचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. बुमराह भारतात कमी चेंडूत 50 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 1747 चेंडूत 50 विकेट घेतल्या आहेत. क्रिकइन्फोनुसार , घरच्या मैदानावर कसोटी खेळणाऱ्या बुमराहने 17च्या सरासरीने 50 विकेट्स घेतल्या आहेत.बुमराहने भारतातील 12 कसोटी सामन्यातील 24 डावांमध्ये विकेट्सचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने जवागल श्रीनाथ यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.