वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन खेळाडू दोन वेगवेगळ्या संघाकडून खेळले, जाणून घ्या

ICC Womens T20 World Cup 2026: वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर रंगतदार वळणावर पोहोचणार आहे. असं असताना या स्पर्धेत एक आश्चर्यकारक प्रकार पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेत दोन खेळाडू टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात दोन वेगवेगळ्या संघाकडून मैदानात उतरले. त्यांच्या नाावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन खेळाडू दोन वेगवेगळ्या संघाकडून खेळले, जाणून घ्या
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन खेळाडूंचा दोन वेगवेगळ्या संघाकडून खेळण्याचा अनोखा प्रकार, जाणून घ्या
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 14, 2026 | 4:56 PM

ICC Womens T20 World Cup 2026: वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात एक अनोख्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. खरं असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. पण आता हा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. स्कॉटलँडची डावखुरी फिरकीपटू कीर्स्टी गॉर्डन मैदानात उतरताच हा विक्रम नोंदवला गेला आहे वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन वेगवेगळ्या देशाकडून खेळणारी पहिला महिला क्रिकेटपटू ठरली. कीर्स्टी गॉर्डननंतर ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज किम गार्थने या अनोख्या यादीत दुसरं स्थान नोंदवलं आहे. ती सुद्धा वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन वेगवेगळ्या संघाकडून खेळणारी खेळाडू ठरली आहे. या खेळाडूंना दुसऱ्या संघात सहजासहजी स्थान मिळालं नाही.  चला जाणून घेऊयात दोन्ही खेळाडू या स्पर्धेत कोणत्या संघाकडून उतरले होते आणि आता कोणत्या संघासाठी खेळत आहेत.

कीर्स्टी गॉर्डन इंग्लंडकडून आणि स्कॉटलँडमध्ये

कीर्स्टी गॉर्डनचा जन्म स्कॉटलँडमध्ये झाला होता आणि सुरूवातीच्या क्रिकेट कारकि‍र्दीत ती 2012 ते 2017 या कालावधीत स्कॉटलँडसाठी खेळली. त्यानंतर इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेट भाग घेतला आणि 2018 मध्ये इंग्लंड संघाच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केलं. तिने 2018 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडकडून भाग घेतला होता. तिने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आणि इंग्लंडला अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी मदत केली. पण आता 9 वर्षांनी तिने नागरिकता बदलली आणि पुन्हा एकदा स्कॉटलँडसाठी मैदानात उतरली आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात तिने 4 षटकात 16 धावा देत 3 विकेट काढल्या.

किम गार्थही दोन संघांकडून खेळले

ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज किम गार्थच्या नावावरही दोन संघांकडून खेळण्याचा विक्रम आहे. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात आयर्लंड संघाकडून केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना दिसली. किम गार्थने 2014, 2016 आणि 2018 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आयर्लंड संघाकडून भाग घेतला होता. पण 2019 मध्ये किम गार्थ ऑस्ट्रेलियात गेली. तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि तिला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळालं. आता 2026 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून खेळत आहे.

Follow Us