AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी केएल राहुलसाठी या संघाने लावली फिल्डिंग! 25 कोटी मोजण्याची तयारी

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मागच्या पर्वापूर्वी मेगा लिलाव पार पडला होता. त्या लिलावात लखनौ सुपर जायंटने केएल राहुलला रिलीज केलं होतं. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने त्याच्यासाठी 14 कोटी मोजले. आता त्याच्या आणखी एका संघाने फिल्डिंग लावली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी केएल राहुलसाठी या संघाने लावली फिल्डिंग! 25 कोटी मोजण्याची तयारी
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी केएल राहुलसाठी या संघाने लावली फिल्डिंग! 25 कोटी मोजण्याची तयारीImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 31, 2025 | 8:25 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत केएल राहुल दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला. त्याला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने नकार दिल्याने अक्षर पटेलकडे सूत्र सोपवण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सने मागच्या पर्वात चांगली सुरुवात केली मात्र त्यानंतर गाडी रुळावरून घसरली. बाद फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आलं. या स्पर्धेत केएल राहुल 13 सामन्यात खेळला आणि 539 धावा केल्या होत्या. आताही केएल राहुल फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली आहे. असं असताना आयपीएल फ्रेंचायझीमध्ये ट्रेड विंडोची दारं खुली झाली आहे. मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करता येणार आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने केएल राहुलसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. केएल राहुलसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिल्ली कॅपिटल्सची चर्चा केल्याचं वृत्त आहे. जर दिल्ली कॅपिटल्सने ऑफर स्वीकारली तर तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसू शकतो.

कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझी पुढील पर्वासाठी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. गेल्या हंगामात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. त्यामुळे आगामी आयपीएल लिलावापूर्वी संघातील काही खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केएल राहुलला संघात घेण्यासाठी रस दाखवल्याची चर्चा आहे.केकेआर फ्रँचायझी केएल राहुलची निवड करून एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न करणार आहे.

पहिलं, कोलकाता नाईट रायडर्सला एका चांगल्या कर्णधाराची गरज आहे. दुसरं, केएल राहुल हा सलामीला फलंदाजी करतो. तिसरं, केएल राहुल विकेटकीपर आहे. केएल राहुलला ट्रेडिंग केल्याने एकाच पर्यायाने तीन समस्या सोडवता येतील. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीसोबत चर्चा करत आहे. फ्रेंचायझी केएल राहुलसाठी 25 कोटी मोजण्यास तयार असल्याची वावड्याही उठल्या आहे. केएल राहुलसाठी दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटींची रक्कम मोजली होती. त्यामुळे त्याच्या पुढेच आकडा असेल यात काही शंका नाही. आयपीएल 2026 मिनी लिलावापूर्वी कोलकाता संघात सहभागी झाला तर आश्चर्य वाटायला नको.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद