AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सायमन हार्मरच्या जादुई चेंडू खेळताना केएल राहुल त्रिफळाचीत, लाजिरवाणा विक्रमही रचला

गुवाहाटी कसोटी सामना भारताच्या हातून जवळपास गेला आहे. खेळपट्टीवर फिरकीची जादू पाहता पहिल्या दोन सत्रातच टीम इंडियाला गाशा गुंडाळावा लागेल अशी स्थिती आहे. त्याची अनुभूती चौथ्या दिवशी सायमन हार्मरने दाखवून दिली आहे. त्याने केएल राहुलची घेतलेली विकेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Video : सायमन हार्मरच्या जादुई चेंडू खेळताना केएल राहुल त्रिफळाचीत, लाजिरवाणा विक्रमही रचला
Video : सायमन हार्मरच्या जादुई चेंडू खेळताना केएल राहुल त्रिफळाचीत, लाजिरवाणा विक्रमही रचलाImage Credit source: PTI
| Updated on: Nov 25, 2025 | 5:01 PM
Share

भारतीय संघाची क्रिकेटमध्ये फिरकीला योग्य रितीने खेळणारे खेळाडू म्हणून ख्याती होती. पण आता तीच ताकद कमकुवत झाल्याचं दिसून येत आहे. कारण फिरकीचा सामना करताना पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची दाणादाण उडाली होती. हा सामना भारताने 30 धावाने गमावला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने फलंदाजीला पूरक अशी विकेट बनवली. पण येथेही भारतीय फलंदाजांनी माती खाल्ली. एकीकडे दक्षिण अफ्रिकन गोलंदाज सहज खेळले. तर भारतीय गोलंदाज 201 धावा करून बाद झाले. दुसऱ्या डावात भारताची स्थिती नाजूक आहे. हातात 8 विकेट असून अजून 522 धावांचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे पराभव निश्चित दिसत आहे. असं असताना चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 गडी गमवून 27 धावा केल्या. यात केएल राहुलची विकेट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. हार्मरने टाकलेल्या जादुई चेंडूवर केएल राहुलला बाद होण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.

सायमन हार्मरने दहाव्या षटकात आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्याने या षटकात दुसरा चेंडू केएल राहुलला ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. हा चेंडू सहज खेळून काढेल असं केएल राहुलला वाटलं. पण टप्पा पडला आणि चेंडू आत घुसला. काही कळायच्या आतचं स्टम्प घेऊन गेला. खरं तर केएल राहुलला काही क्षण काय झालं हेच कळलं नाही. पण चेंडू जबरदस्त टर्न होऊन स्टम्प घेऊन गेला होता. त्यामुळे मान खाली घालून तंबूत जाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.

केएल राहुलच्या नावावर नकोसा विक्रम

गुवाहाटी कसोटीच्या दुसऱ्या डावातही वनडे कर्णधार केएल राहुल फेल गेला. त्याला फक्त 6 धावाच करता आल्या. यासह त्याने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सर्वाधिक वेळा एकेरी धावांवर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. केएल राहुल 0 ते 9 धावांच्या मध्ये एकंदरीत 39 वेळा बाद झाला आहे. यासह त्याने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. केएल राहुलची अशी कामगिरी पाहता कसोटी कारकि‍र्दीत सर्वाधिक वेळा अपयशी ठरल्याचं दिसत आहे. त्याच्याकडे खेळण्याची चांगली कला असूनही अशा पद्धतीचा रेकॉर्ड पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?