KL Rahul: लग्नाआधी के.एल.राहुलच ‘या’ मंदिरात देवदर्शन

KL Rahul: जानेवारी 2023 मध्ये केएल राहुल महाराष्ट्रातील 'य़ा' ठिकाणी करणार लग्न

KL Rahul: लग्नाआधी के.एल.राहुलच या मंदिरात देवदर्शन
KL Rahul-Athiya Shetty
Image Credit source: instagram
| Updated on: Nov 24, 2022 | 4:46 PM

बंगळुरु: टीम इंडियाचा उपकर्णधार के.एल.राहुल सध्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. जानेवारी 2023 मध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत विवाहबद्ध होणार आहे. विवाह बंधनात अडकण्याआधी केएल राहुलने काल मँगलोरच्या प्रसिद्ध कुक्के सुब्रमण्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. राहुलसोबत यावेळी त्याचे मित्र होते. अथिया शेट्टीने मंदिरात येणं टाळलं.

कुठे होणार लग्न?

अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील बंगल्यात राहुल आणि अथिया जानेवारी 2023 मध्ये सातफेरे घेणार आहेत. सध्या राहुल ब्रेकवर आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याने विश्रांती घेतली आहे. आता तो पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या बांग्लादेश सीरीजमध्ये दिसेल.

राहुलला आणखी किती संधी द्यायची?

टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकड़ून 10 विकेटने पराभव झाला. त्यानंतर राहुलच्या टीममधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलय. केएल राहुलने वर्ल्ड कपच्या दोन सामन्यात अर्धशतकं झळकावली. पण अन्य महत्त्वाच्या सामन्यात त्याची बॅट चालली नाही. त्यामुळे केएल राहुलला आणखी किती संधी देणार? असा प्रश्न विचारला जातोय.

‘गडबड’ आइस्क्रीमचा स्वाद

मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन राम सुल्ली आणि मंदिराच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केएल राहुलची देव दर्शन करताना विशेष काळजी घेतली. केएल राहुल मँगलोरमध्ये लहानाचा मोठा झालाय. राहुलने मंदिरात दर्शनासाठी जाताना पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्याने मँगलोरच्या प्रसिद्ध ‘गडबड’ आइस्क्रीमचा स्वाद चाखला.

राहुल-अथियाच्या लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही. पण दोघे जानेवारी 2023 मध्ये विवाहबद्ध होतील. मागच्या तीन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध आहेत.