AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, LSG vs MI, Live Streaming : जाणून घ्या लखनौ विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

आजचा सामना मुंबईसाठी महत्वा्चा आहे. हा सामना कधी, कुठे खेळवला जाणार?. जाणून घ्या

IPL 2022, LSG vs MI, Live Streaming : जाणून घ्या लखनौ विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
मुंबई विरुद्ध लखनौ सामनाImage Credit source: twitter
| Updated on: Apr 24, 2022 | 6:01 AM
Share

मुंबई : आजचा दिवस मुंबई इंडियन्ससाठी (MI) खूप महत्वाचा आहे. आज लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने 14 सामन्यांपैकी पहिले 7  सामने मुंबई इंडियन्सने गमावले आहेत. अशा स्थितीत मुंबईने आगामी सात सामने जिंकले तरी केवळ 14 गुण जमा करू शकतील. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाचे 16 गुण असणे आवश्यक आहे. मात्र, मुंबईचा संघ उर्वरित संघांच्या बाजूने असेल आणि संघाने धावगती सुधारली तर एक टक्का मुंबई पात्र ठरेल, असं बोललं जातंय. लखनौने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये एकूण सात सामने खेळवले आहे. त्यापैकी लखनौच्या संघाला चार सामन्यात यश आलंय. तर तीन सामन्यात लखनौच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. लखनौचा नेट रेट 0.124 आहे. तर या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये आठ गुण मिळाले आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा विचार केल्यास या संघाला अजूनही विजयाचं खातं आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये उघडता आलेलं नाही. त्यांनी आतापर्यंत सात सामने खेळले आहे. त्या सातही सामन्यात त्यांना अपयश आलंय. इंडियन्सचा रन रेट -0.892 असून हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 24 एप्रिल (रविवार) रोजी खेळवला जाणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना सायंकाली  7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

इतर बातम्या

Crime : एक बातमी, जी देताना आमचं काळीज जड झालंय, फोटो पहा म्हणण्याची आमची हिंमत नाही, तुम्ही सावध असा !

Video : भरमंडपात नवरा-नवरीमध्ये रंगली पुशअप स्पर्धा, नेटकरी म्हणतात, “हेच बघायचं राहिलं होतं!”

Raosaheb Danve : राज्य सरकारच्या नियोजनाअभावी सहन करावी लागतेय कोळसाटंचाई; रावसाहेब दानवेंचा पुण्यात हल्लाबोल

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.