KKR vs MI Live Updates and Highlights, IPL 2026: कोलकाताचा मुंबई विरुद्ध 4 विकेट्सने विजय, केकेआरचं आव्हान कायम

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Indian Premier League 2026 Score Updates and Highlights In Marathi : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी होती. केकेआरने हा सामना जिंकून मुंबईचा हिशोब चुकता केला. केकेआरने या विजयासह आपलं आव्हान कायम ठेवलंय.

KKR vs MI Live Updates and Highlights, IPL 2026: कोलकाताचा मुंबई विरुद्ध 4 विकेट्सने विजय, केकेआरचं आव्हान कायम
KKR vs MI Live Score Updates IPL 2026
Image Credit source: TV9
| Updated on: May 21, 2026 | 2:35 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये करण्यात आलं होतं. होम टीम केकेआरने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने यासह प्लेऑफमधील आपली आशा कायम ठेवण्यात  यश मिळवलं आहे. मुंबई इंडियन्सने केकेआरसमोर विजयासाठी 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं.  केकेआरने हे विजयी आव्हान 6 विकेट्स गमावून 18.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. केकेआरचा हा या मोसमातील सहावा आणि मुंबई विरुद्धचा पहिला विजय ठरला. केकेआरने या विजयासह मुंबईचाही हिशोब चुकता केला.  मुंबईने याआधी 30 मार्च 2026 रोजी केकेआरला पराभूत केलं होतं.  आता केकेआरने हा सामना जिंकून मुंबईने केलेल्या पराभवाची परतफेड केली आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 21 May 2026 12:20 AM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : कोलकाताचा मुंबई विरुद्ध 4 विकेट्सने विजय, केकेआरचं आवहान कायम

    कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात इडन्स गार्डन्समध्ये आयपीएल स्पर्धेच्या 64 व्या सामन्यात मुंबई इंडियन विरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने यासह 2 गुणांची कमाई केली आहे. मुंबईने विजयासाठी दिलेलं 148 धावांचं आव्हान केकेआरने 18.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. केकेआरने यासह प्लेऑफमधील आपली आशा कायम ठेवली आहे.

  • 21 May 2026 12:02 AM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : केकेआरला पाचवा धक्का, रोव्हमॅन पॉवेल आऊट

    अल्लाह गझनफर याने रोव्हनमॅन पॉवेल याला आऊट करुन केकेआरला पाचवा झटका दिला आहे. रोव्हमॅनने केकेआरसाठी सर्वाधिक धावा केल्या. रोव्हमॅनने 33 बॉलमध्ये 45 रन्स केल्या.


  • 20 May 2026 11:52 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : केकेआरला चौथा धक्का, मनीष पांडे आऊट

    जसप्रीत बुमराह याने सेट मनीष पांडे याला बोल्ड करत केकेआरला चौथा झटका दिला आहे. मनीष पांडे याने  33 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. त्यामुळे आता केकेआरला विजयासाठी 30 बॉलमध्ये 30 रन्सची गरज आहे.

  • 20 May 2026 11:30 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : पांडे-पॉवेल जोडी जमली, केकेआर मजबूत स्थितीत

    मनीष पांडे आणि रोव्हमॅन पॉवेल जोडी जमली आहे. मनीष आणि रोव्हमॅन या दोघांनी केकेआरला 10 ओव्हरमध्ये 3 आऊट 84 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. त्यामुळे आता केकेआरला विजयसााठी आणखी 60 बॉलमध्ये 64 रन्सची गरज आहे.

  • 20 May 2026 11:14 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : कॅमरुन ग्रीन आऊट, केकेआरला तिसरा झटका

    कॉर्बिन बॉश याने आपली दुसरी विकेट मिळवून केकेआरला तिसरा झटका दिला आहे. कॉर्बिनने विस्फोटक फलंदाज कॅमरुन ग्रीन याला आऊट केलं. ग्रीनने 8 बॉलमध्ये 4 रन्स केल्या.

  • 20 May 2026 11:08 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : केकेआरला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणे बाद

    केकेआरला कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रूपाने दुसरा धक्का बसला आहे. अजिंक्य रहाणने 17 चेंडूत 21 धावा करून तंबूत परतला आहे. पावरप्लेमध्ये 2 बाद 51 धावा झाल्या.

  • 20 May 2026 10:42 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : केकेआरला पहिला धक्का, फिन एलन बाद

    फिन एलनच्या रुपाने कोलकाता नाईट रायडर्सला पहिला धक्का बसला. दीपक चाहरने त्याची विकेट काढली. त्याने 5 चेंडूत 8 धावा केल्या.

  • 20 May 2026 10:40 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : अजिंक्य रहाणे आणि फिन एलन जोडी मैदानात

    मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी केकेआरकडून अजिंक्य रहाणे आणि फिन एलन ही जोडी मैदानात उतरली आहे.

  • 20 May 2026 10:24 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : कॉर्बिन बॉशची निर्णायक खेळी, मुंबईच्या 147 धावा, केकेआर जिंकणार?

    कॉर्बिन बॉश याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर मुंबई इंडियन्सला केकेआरसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं आहे. मुंबईने केकेआरसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स 147 धावा केल्या. मुंबईसाठी कॉर्बिन बॉश याने सर्वाधिक 32 रन्स केल्या. त्यामुळे आता कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 20 May 2026 10:05 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : विल जॅक्स रन आऊट, मुंबईला सातवा धक्का

    केकेआरने मुंबईला सातवा झटका दिला आहे. उपकर्णधार रिंकू सिंह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी मिळून विल जॅक्स याला रन आऊट केलं. जॅक्सने 7 बॉलमध्ये 14 रन्स केल्या.

  • 20 May 2026 09:55 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : हार्दिक पंड्या आऊट, मुंबईला सहावा झटका, केकेआरची सामन्यावर घट्ट पकड

    केकेआरने मुंबईला सहावा झटका दिला आहे. सुनील नारायण याने मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याला बोल्ड केलं आहे. हार्दिकने 27 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. मुंबईचा स्कोअर 15.2 ओव्हरमध्ये 6 आऊट 95 असा झाला आहे.

  • 20 May 2026 09:44 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : तिलक वर्मा आऊट, मुंबईला पाचवा झटका, पलटण अडचणीत

    केकेआरने मुंबईला पाचवा आणि मोठा झटका दिला आहे. कार्तिक त्यागी याने तिलक वर्मा याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. कार्तिकने तिलकला अनुकूल रॉय याच्या हाती 20 रन्सवर कॅच आऊट केलं आहे.

  • 20 May 2026 09:37 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : केकेआरची चिवट बॉलिंग, हार्दिक-तिलकला गिअर बदलण्याची गरज

    कोलकाता नाईट रायडर्सने चिवट बॉलिंग केली आहे. केकेआरने हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या स्फोटक जोडीसमोर चिवट बॉलिंग केलीय. त्यामुळे मुंबईची स्थिती 13 ओव्हरनंतर 4 आऊट 83 अशी झालीय.

     

  • 20 May 2026 09:18 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : पावसाच्या खोड्यानंतर खेळाला सुरुवात, तिलक-हार्दिक मैदानात

    पावसाच्या खोड्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील खेळाला पुन्हा सुरुवात झाली आहे. तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या ही जोडी मैदानात खेळत आहे. मुंबईने पावसामुळे खेळ थांबला तोवर 8 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 57 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता मुंबई उर्वरित 12 ओव्हरमध्ये किती धावा करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 20 May 2026 09:07 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : पाऊस थांबला, खेळाला किती वाजता सुरुवात? जाणून घ्या वेळ

    इडन गार्डन्समध्ये अखेर पावसाची रिमझिम थांबली आहे. खेळाला आता 9 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पावसाुळे 45 मिनिटांचा खेळ वाया जाऊनही एकही ओव्हर कमी करण्यात आलेली नाही.

  • 20 May 2026 08:50 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : पावसामुळे 30 मिनिटं वाया, ओव्हर कट होणार?

    पावसामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील 30 मिनिटांचा खेळ वाया गेला आहे. त्यामुळे आता ओव्हर कट होणार की पूर्ण खेळ होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 20 May 2026 08:18 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : सामन्यात पावसाची एन्ट्री, खेळ थांबवला

    केकेआर-मुंबई सामन्यात पावसाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे खेळ थांबवणयात आला आहे. ग्राउंड स्टाफकडून खेळपट्टी कव्हरने झाकण्यात आली आहे. आता खेळाला पुन्हा केव्हा सुरुवात होणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 20 May 2026 08:04 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : सूर्यकुमार यादव आऊट, मुंबईला पावरप्लेमध्ये चौथा झटका

    केकेआरने मुंबईला चौथा झटका दिला आहे. सूर्यकुमार यादव 6 बॉलमध्ये 15 रन्सवर आऊट झाला. सौरभ दुबेने सूर्याला बोल्ड केलं. त्यामुळे मुंबईचा स्कोअर 5.3 ओव्हरमध्ये 4 आऊट 41 असा झाला आहे.

  • 20 May 2026 07:53 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : रोहित शर्माही आऊट, मुंबईला पावरप्लेमध्ये तिसरा झटका

    केकेआरने मुंबई इंडियन्सला पावर प्लेमध्ये तिसरा झटका दिला आहे. केकेआरने रायन रिकेल्टन, नमन धीर याच्यानंतर रोहित शर्मा याला आऊट केलं आहे. सौरभ दुबे याने रोहितला आऊट केलं. कॅमरुन ग्रीन याने रोहितचा उलट धावत अप्रतिम कॅच घेतला. रोहितने 13 बॉलमध्ये 2 सिक्ससह 15 रन्स केल्या.

  • 20 May 2026 07:48 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : कॅमरुन ग्रीनचा डबल धमाका, मुंबईला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके

    कॅमरुन ग्रीन याने डबल धमाका केला आहे. कॅमरुनने मुंबईला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहे. कॅमरुनने आधी रायन रिकेल्टन याला मनीष पांडे याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर ग्रीनने नमन धीर याला झिरोवर विकेटकीपर अंगकृष रघुवंशी याच्या हाती कॅच आऊट  केलं. त्यामुळे मुंबईची 3 ओव्हरमध्ये 2 आऊट 17 रन्स अशी स्थिती झाली आहे.

  • 20 May 2026 07:44 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : मनीष पांडेकडून कडक कॅच, मुंबईला पहिला झटका, रायन रिकेल्टन आऊट

    केकेआरने मुंबईला पहिला झटका दिला आहे. कॅमरुन ग्रीन याने रायन रिकेल्टन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. मनीष पांडे याने रायनचा अप्रतिम कॅच घेतला. रायनने 7 बॉलमध्ये 6 रन्स केल्या.

  • 20 May 2026 07:31 PM (IST)

    KKR vs MI Live Score Updates : सामन्याला सुरुवात, मुंबईची बॅटिंग, रोहित-रायन मैदानात

    कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. केकेआरने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी बोलावलंय. मुंबईकडून रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 20 May 2026 07:11 PM (IST)

    KKR vs MI Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन

    कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन: अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरुन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती आणि सौरभ दुबे.

  • 20 May 2026 07:10 PM (IST)

    KKR vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा , नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह आणि रघु शर्मा.

  • 20 May 2026 07:04 PM (IST)

    KKR vs MI Live Updates : केकेआरने टॉस जिंकला, मुंबई विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय

    कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. केकेआर आणि मुंबईची या मोसमात आमेनसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे.

  • 20 May 2026 06:40 PM (IST)

    KKR vs MI Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स टीम

    अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मनीष पांडे, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथीराना, वैभव अरोरा, रमणदीप सिंग, तेजस्वी दहिया, रोवमन पॉवेल, नवदीप सैनी, टीम सायफर्ट, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, सार्थक रंजन, प्रशांत सोलंकी, दक्ष कामरा आणि ब्लेसिंग मुजराबानी.

  • 20 May 2026 06:39 PM (IST)

    KKR vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स टीम

    जसप्रीत बुमराह (कॅप्टन), रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रघु शर्मा, ट्रेंट बोल्ट, मयंक रावत, रॉबिन मिंज, क्रिश भगत, सूर्यकुमार यादव, एएम गझनफर, हार्दिक पंड्या, केशव महाराज, अश्वनी कुमार, मयंक मार्कंडे, दानिश मालेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.

  • 20 May 2026 06:29 PM (IST)

    KKR vs MI Live Updates : कोलकाता मुंबईचा हिशोब करणार का?

    केकेआर आणि मुंबई यांच्यातील हा 19 व्या मोसमातील दुसरा सामना असणार आहे. मुंबईने याआधी 30 मार्च रोजी झालेल्या सामन्यात केकेआरचा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली होती. त्यामुळे आता केकेआरकडे या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. अशात आता केकेआर यशस्वी ठरणार की मुंबई 2 गुणांची कमाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 20 May 2026 06:25 PM (IST)

    KKR vs MI Live Updates : कोलकातासमोर मुंबईचं आव्हान, केकेआर पलटणचा धुव्वा उडवणार?

    कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला 20 मे रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.तर 7 वाजता टॉस होणार आहे. सामन्याचं आयोजन हे कोलकातमधील इडन गार्डन्समध्ये करण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us