AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs PBKS Live Streaming : कोलकाता-पंजाब तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज, 2 मुंबईकर कर्णधार आमनेसामने, मॅच किती वाजता?

Kolkata Knight Riders vs Punjab Kings IPL 2026 Live Scorecard : श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी सोमवारी आपल्या टीमला जिंकवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. या 2 मुंबईकर फलंदाजांच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

KKR vs PBKS Live Streaming : कोलकाता-पंजाब तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज, 2 मुंबईकर कर्णधार आमनेसामने, मॅच किती वाजता?
Ajinkya Rahane and Shreyas Iyer KKR vs PBKSImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 06, 2026 | 2:24 AM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) 4 आणि 5 एप्रिलला सलग 2 दिवस डबल हेडरचा थरार पार पडला. पहिल्या डबल हेडरमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सला तर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला पराभूत केलं. तसेच रविवारी लखनौने हैदराबादवर तर बंगळुरुने चेन्नईवर मात केली. आता सोमवारपासून पुन्हा एकदा दररोज 1 सामना होणार आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. केकेआरचा घरच्या मैदानात मोसमातील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर पंजाब आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कधी?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना सोमवारी 6 एप्रिलला होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

2 मुंबईकर कर्णधार आमेनसामने

केकेआर आणि पंजाब या सामन्यानिमित्ताने 2 मुंबईकर सहकारी एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. अजिंक्य रहाणे केकेआरचं नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाबच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. श्रेयस आणि अजिंक्य देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. दोघेही अनेक वर्ष एकत्र खेळले आहेत. त्यामुळे दोघांना एकमेकांची जमेची आणि पडती बाजू माहिती आहे.त्यामुळे सोमवारी कोणता संघ यशस्वी ठरतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल