लिहून घ्या..! कुलदीप यादव 4 विकेट काढणार, रुग्णालयातून पाकिस्तानी क्रिकेपटूचं भाकीत Video

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताने विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं आहे. असं असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने कुलदीप यादवबाबत एक भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे क्रीडावर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लिहून घ्या..! कुलदीप यादव 4 विकेट काढणार, रुग्णालयातून पाकिस्तानी क्रिकेपटूचं भाकीत Video
लिहून घ्या..! कुलदीप यादव 4 विकेट काढणार, रुग्णालयातून पाकिस्तानी क्रिकेपटूचं भाकीत Video
Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 18, 2026 | 4:22 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताला श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका काहीही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. असं असताना पहिला कसोटी सामन्यात निकाल अपेक्षित आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. खरं तर हे श्रीलंकेसाठी खूपच खडतर आव्हान आहे. त्यामुळे भारताच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने रुग्णालयातील बेडवरून एक भाकीत वर्तवलं आहे. पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू बासित अली यांनी रुग्णालयात आजारपणावर उपचार सुरू असताना एक भविष्यवाणी केली आहे. भारत श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कुलदीप यादवच्या कामगिरीवर भाष्य केलं आहे. बासित अली यांच्या मते, कुलदीप यादव गॉल कसोटीच्या दुसर्‍या डावात आरामात चार विकेट काढेल.

लिहून घ्या… कुलदीप यादव 4 विकेट काढेल

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू बासित अली सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असं असताना त्यांनी क्रिकेटबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे. एका चर्चेत सहभागी असताना भारत श्रीलंका कसोटी सामन्याची समीक्षा करत होते. तेव्हा पहिल्या डावात रवींद्र जडेजा आणि मानव सुथारने कमाल केली होती. मानव सुथारने 4, तर रवींद्र जडेजाने 3 विकेट काढल्या होत्या. तेव्हा कुलदीपला एकच विकेट मिळाली होती. यावर बासित अली यांनी उत्तर देत सांगितलं की, लिहून घ्या, कुलदीप यादव पुढच्या डावात 4 विकेट काढेल.

गॉलच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाची दाणादाण उडून गेली होती. तशीच काहीशी स्थिती श्रीलंकेची होईल असा अंदाज क्रीडाप्रेमी वर्तवत आहेत. पण श्रीलंकेसाठी हे होमग्राउंड आहे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेण्याची चूक भारतीय गोलंदाजांनी करून नये. उलट झटपट विकेट घेण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे. गॉलच्या मैदानात 371 धावांचं आव्हान खूप मोठं आहे. त्यात फिरकीचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही. पहिल्या डावात भारताच्या फिरकीपटूंनी 10 पैकी 8 विकेट काढल्या होत्या. आता कुलदीप यादव दुसऱ्या डावात किती विकेट काढतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us