AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC आंदोलनाबाबत मोठी अपडेट! राज ठाकरे मैदानात उतरणार; पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेणार, तारीख आली समोर

Raj Thackeray MPSC Protest: उपोषणाला बसलेल्या MPSC विद्यार्थ्यांची राज ठाकरे भेट घेणार आहेत. ५ ऑक्टोबरला MPSC विद्यार्थ्यांसाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत.

MPSC आंदोलनाबाबत मोठी अपडेट! राज ठाकरे मैदानात उतरणार; पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेणार, तारीख आली समोर
| Updated on: Oct 03, 2026 | 11:52 PM
Share

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट देणार आहेत. येत्या सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे पुण्यातील आंदोलनस्थळी जाऊन उपोषणाला बसलेल्या MPSC विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. MPSC परीक्षेतील कथित अनियमितता, पेपरफुटीचे प्रकरण, रखडलेली भरती प्रक्रिया आणि आयोगाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MPSC विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली.

सचिवांची बदली, परीक्षा प्रक्रिया ऑफलाइन करण्याबाबतचे आश्वासन आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या चौकशीसंदर्भात सरकारकडून भूमिका मांडण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आंदोलनाच्या एका गटाने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे सोमवारी पुण्याकडे रवाना होणार आहेत. मुंबईतील नियोजित मोर्चा झाल्यानंतर ते पुण्यात पोहोचतील.

सकाळी आंदोलनस्थळी जाऊन उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतील आणि त्यांच्या मागण्या तसेच आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतील. राज ठाकरे विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या आंदोलनाबाबत काय भूमिका मांडतात, याकडे आता लक्ष लागले आहे. MPSCच्या परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आयोगाच्या कारभारावरून सुरू असलेल्या या आंदोलनात राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पुढील राजकीय प्रतिक्रिया काय उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर