AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SL | कुसल मेंडीस-समराविक्रमा जोडीची झंझावाती खेळी, पाकिस्तानसमोर 345 धावांचं आव्हान

Pakistan vs Sri Lanka Icc World Cup 2023 | पाकिस्तानला वर्ल्ड कपमधील सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी 345 आव्हान मिळालंय. पाकिस्तान इतक्या धावा करेल का?

PAK vs SL | कुसल मेंडीस-समराविक्रमा जोडीची झंझावाती खेळी, पाकिस्तानसमोर 345 धावांचं आव्हान
| Updated on: Oct 10, 2023 | 8:20 PM
Share

हैदराबाद | सदीरा समरविक्रमा आणि कुसल मेंडीस या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंका टीमने पाकिस्तानला विजयासाठी 345 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 344 धावा केल्या. श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याने 108 आणि कुसल मेंडीस याने 122 धावांची धुव्वादार शतकी खेळी केली. या दोघांच्या शतकाच्या मदतीने श्रीलंकेने 300 पार मजल मारली. आता पाकिस्तान या 345 धावांचं कशाप्रकारे पाठलाग करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

श्रीलंकेची बॅटिंग

श्रीलंकेकडून ओपनर बॅट्समन पाथुम निसांका याने 61 बॉलमध्ये 51 धावा केल्या. कुसल परेरा आला तसाच झिरोवर आऊट होऊन गेला. कुसल मेंडीस याने 77 बॉलमध्ये 14 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 122 धावांची वादळी खेळी केली. सदीरा समरविक्रमा 89 बॉलमध्ये 11 फोर आणि 2 सिक्ससह 108 धावा करुन बाद धाला. चरिथ असलंका 1 धाव करुन आऊट झाला. धनंजया डी सिल्वा याने 25 धावांचं योगदान दिलं.

कॅप्टन दासून शनाका याने 18 बॉलमध्ये 25 रन्स केल्या. दुनिथ वेल्लालागे याने 12 धावा जोडल्या. महीश तीक्ष्णा याला भोपळाही फोडता आला नाही. तर मथीशा पथिराणा 1 धावेवर नाबाद राहिला. तर पाकिस्तानकडून हसन अली याने सर्वाधिक 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हसनने 10 ओव्हरमध्ये 71 धावांच्या मोबदल्यात या 4 विकेट्स घेतल्या. हरीस रौफ याने 2 विकेट्स घेतल हसनला चांगली साथ दिली. तर शाहीन अफ्रदी, मोहम्मद नवाझ आणि शादाब खान या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विकेट गेली.

कुसल-सदीराची तोडफोड बॅटिंग

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच