LSG vs CSK IPL 2022: छे, शिवम दुबेमुळे नाही, आम्ही दवामुळे हरलो – स्टीफन फ्लेमिंग

LSG vs CSK IPL 2022: आयपीएल 2022 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला (CSK) काल सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 210 धावांचे विशाल लक्ष्य उभे केले होते.

LSG vs CSK IPL 2022: छे, शिवम दुबेमुळे नाही, आम्ही दवामुळे हरलो - स्टीफन फ्लेमिंग
शिवम दुबे-स्टीफन फ्लेमिंग
Image Credit source: IPL
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 01, 2022 | 5:21 PM

मुंबई: आयपीएल 2022 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला (CSK) काल सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 210 धावांचे विशाल लक्ष्य उभे केले होते. पण इतकी मोठी धावसंख्या करुनही चेन्नईचा पराभव झाला. या पराभवाने चेन्नईच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. शिवम दुबेने (Shivam Dubey) टाकलेल्या 19 व्या षटकात सामना पूर्णपणे लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने फिरला. शिवम दुबेने या षटकात 25 धावा दिल्या. शिवम दुबेच्या ओव्हरमुळे चेन्नईचा पराभव झाला. पण कोच स्टीफन फ्लेमिंग (stephen fleming) यांनी शिवम दुबेची पाठराखण केली. पराभवासाठी फ्लेमिंग यांनी दवाला जबाबदार धरलं आहे. स्टीफन फ्लेमिंग यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमवर पडलेल्या दवाची तुलना अमेरिकेतील प्रसिद्धा नायगारा धबधब्याशी केली आहे. सामन्यातील 19 व षटक कुठल्या फिरकी गोलंदाजाऐवजी शिवम दुबेकडे सोपवण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं.

अखेरच्या दोन षटकात लखनौला विजयासाठी 12 चेंडूत 34 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी CSK चा कॅप्टन रवींद्र जाडेजाने चेंडू शिवम दुबेकडे सोपवला. त्या ओव्हरमध्ये इविन लुईस आणि आयुष बदोनीने मिळून 25 धावा वसूल केल्या. लुईस सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. हे षटक चेन्नईसाठी खूपच महागडं ठरलं.

शिवम दुबेला का दिलं षटक?

“तुम्ही परिस्थिती लक्षात घेतली, तर स्पिन पर्याय आजमावणं योग्य ठरलं नसतं. दवाचा विचार केला तर नायगारा धबधब्यासारखी स्थिती होती. लखनौने चांगला खेळ दाखवला” असं फ्लेमिंगने वर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितलं. भरपूर दव पडत होता, त्यामुळे स्पिनर्सना चेंडूवर ग्रीप मिळवणं कठीण जात होतं, असं फ्लेमिंग यांनी सांगितलं. फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाने दोन षटकात 21 तर मोईन अलीने एका ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या. यामुळे चेन्नईने मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेचा पर्याय अवलंबला.

तुषार देशपांडे बद्दल फ्लेमिंग म्हणाले…

“स्पिनर ऐवजी मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेकडे त्यांनी मैदानातच चेंडू सोपवण्याचा निर्णय़ घेतला. हा निर्णय योग्य होता” असं फ्लेमिंग यांनी म्हटलं आहे. केएल राहुल (40) आणि क्विंटन डि कॉकच्या (61) धावांच्या बळावर लखनौने पहिल्या 10 षटकात 99 धावा फटकावल्या. भरपूर दव पडता होता, अशा स्थितीत नवीन चेंडू हाताळणाऱ्या तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरीचं फ्लेमिंगने कौतुक केलं. “आम्ही काही युवा खेळाडूंना संधी दिली. मुकेश पहिल्यांदा खेळत होता. देशपांडे याआधी काही सामने खेळला आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास इथे गोलंदाजी करणं मुश्किल होतं. चेंडू आणि आउटफिल्ड दोन्ही ओलं होतं” असे फ्लेमिंग म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें