LSG vs RCB : आरसीबीने निर्णायक सामन्यात टॉस जिंकला, लखनौ विरुद्ध फिल्डिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru Toss : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं आहे. मात्र त्यानंतरही आरसीबीसाठी लखनौ विरुद्धचा सामना हा फार महत्त्वाचा आहे.

LSG vs RCB : आरसीबीने निर्णायक सामन्यात टॉस जिंकला, लखनौ विरुद्ध फिल्डिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
Rishahb Pant and Jitesh Sharma LSG vs RCB Ipl 2025 Toss
Image Credit source: Social Media
| Updated on: May 27, 2025 | 7:54 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील साखळी फेरीतील 70 व्या आणि शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार जितेश शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेत लखनौला घरच्या मैदानात बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे लखनौ या सामन्यात आरसीबीचा गेम करत टॉप 2 चं स्वप्न भंग करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आरसीबीचं मिशन टॉप 2

लखनौ सुपर जायंट्स या स्पर्धेतून केव्हाच बाहेर पडली आहे. त्यामुळे लखनौचा हा सामना जिंकून मोहिमेतील शेवट विजयाने करण्याचा असणार आहे. तसेच लखनौचा विजय व्हावा, यासाठी गुजरात टायटन्स प्रार्थना करत आहे. कारण आरसीबीला टॉप 2 मध्ये पोहचण्यासाठी लखनौ विरुद्ध जिंकणं बंधनकारक आहे. आरसीबीने हा सामना जिंकला तर ते दुसऱ्या स्थानी पोहचतील. त्यामुळे आरसीबीला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 संधी मिळतील. आरसीबी जिंकली तर दुसऱ्या स्थानी असलेल्या गुजरातची चौथ्या स्थानी घसरण होईल. मात्र लखनौ जिंकली तर गुजरात टॉप 2 मध्ये कायम राहिल. तर आरसीबीला एलिमिनेटरमध्ये खेळावं लागेल. त्यामुळे या सामन्याच्या निकालावर आरसीबी आणि गुजरातचं भवितव्य ठरणार आहे.

प्लेऑफचं गणित

पंजाब किंग्सने सोमवारी 26 मे रोजी मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. पंजाबच्या या विजयासह ते क्वालिफायर 1 मध्ये खेळणार हे स्पष्ट झालं. तर मुंबईला पराभवामुळे एलिमिनेटर खेळावा लागणार आहे. तर आता लखनौ विजय मिळवून गुजरातला टॉप 2 मध्ये राहण्यास मदत करते की आरसीबी एलएसजीवर घरच्या मैदानात मात करुन अंतिम फेरीत 2 वेळा पोहचण्याची संधी मिळवते? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

आरसीबीने टॉक जिंकला

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (कॅप्टन आणि विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल आणि नुवान तुषारा.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेशसिंग राठी, आवेश खान आणि विल्यम ओरुर्के.