AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs RCB : मिचेल मार्शचा तडाखा, लखनौचं द्विशतक, आरसीबीसमोर 213 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru : लखनौ सुपर जायंट्सने आपल्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 200 प्लस रन्स केल्या. लखनौसाठी मिचेल मार्श याने सर्वाधिक योगदान दिलं. तसेच अखेरच्या क्षणी कॅप्टन ऋषभ पंत याने फिनिशिंग टच दिला.

LSG vs RCB : मिचेल मार्शचा तडाखा, लखनौचं द्विशतक, आरसीबीसमोर 213 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Nicholas Pooran and Mitchell MarshImage Credit source: Bcci
| Updated on: May 07, 2026 | 11:16 PM
Share

ओपनर मिचेल मार्श याने केलेल्या चाबूक शतकी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पहिल्यांदाच 200 पार मजल मारली आहे. मार्शने एकाना स्टेडियममध्ये स्पर्धेतील 50 व्या सामन्यात केलेल्या शतकामुळे लखनौला आरसीबीसमोर 213 धावांचं आव्हान ठेवता आलं. लखनौने पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. मात्र डीएलएसनुसार, आरसीबीला सामना जिंकायचं असेल तर 213 धावा कराव्या लागणार आहेत. लखनौला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता लखनौ आपलं आव्हान कायम राखणार की आरसीबी जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सामन्यात एकूण 3 वेळा पावसाचं विघ्न

आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र लखनौच्या डावात पावसाने एकूण 3 वेळा खोडा घातला. त्यामुळे नाईलाजाने अखेर सामन्यातील 1 ओव्हर कमी करण्यात आली. लखनौने 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 209 धावांपर्यंत मजल मारली.

लखनौ सुपर जायंट्सची अप्रतिम सुरुवात

लखनौला मिचेल मार्श आणि अर्शीन कुलकर्णी या सलामी जोडीने चाबूक सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 9.2 ओव्हरमध्ये 95 रन्सची पार्टनरशीप केली. लखनौने अर्शीनच्या रुपात पहिली विकेट गमावली. अर्शीनने 24 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. त्यानंतर मिचेल आणि निकोल पूरन या दोघांनी आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली.

लाईव्ह स्कोअरकार्ड

मिचेल मार्शची झंझावाती शतकी खेळी

पूरन आणि मार्शने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी 41 चेंडूत 70 धावा जोडल्या. त्यानंतर मार्श आऊट झाला. मार्शने लखनौसाठी सर्वाधिक धावा केल्या. मार्शने 56 बॉलमध्ये 198.21 च्या स्ट्राईक रेटने 111 रन्स केल्या. मार्शनंतर निकोलस पूरन आऊट झाला. पूरनने 23 बॉलमध्ये 38 रन्स केल्या. पूरनने या खेळीत 1 षटकार आणि 4 चौकार लगावले.

लखनौ घरच्या मैदानात जिंकणार?

कॅप्टन ऋषभ पंत याची फायर खेळी

तसेच एडन मार्करम आणि कॅप्टन ऋषभ पंत ही जोडी नाबाद परतली. एडनने नाबाद 1 धाव केली. तर ऋषभने 10 बॉलमध्ये 320 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 32 रन्सची फायर खेळी केली. ऋषभने या दरम्यान 2 सिक्स आणि 4 फोर ठोकले. तर आरसीबीसाठी जोस हेझलवूड, कृणाल पंड्या आणि रसीख सलाम दार या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?