KL Rahul : ‘बरं झालं केएल राहुलला टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये नाही घेतलं…’, आता असंच म्हणावं लागेल

KL Rahul : लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुल पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केलं जातय. राहुल स्वत: सुद्धा खूप निराश आहे. केएल राहुलला टॅलेंटेड खेळाडू म्हटलं जातं. पण असं टॅलेंट काय कामाचं? जे मॅचमध्ये आपल्याच टीमच नुकसान करेल.

KL Rahul : 'बरं झालं केएल राहुलला टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये नाही घेतलं...', आता असंच म्हणावं लागेल
LSG Captain KL RahulImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 8:51 AM

टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुलमध्ये भरपूर टॅलेंट आहे, असं म्हटलं जातं. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेट्समध्ये सर्वच प्रकारचे शॉट्स मारण्याची या खेळाडूची क्षमता आहे, असंही बोलल जातं. पण असं टॅलेंट काय कामाचं? जे मॅचमध्ये आपल्याच टीमच नुकसान करेल. केएल राहुलने आयपीएल 2024 च्या 57 व्या सामन्यात ते करुन दाखवलं, ज्याची अपेक्षा जगातील कुठल्याही कॅप्टनकडून नसते. राहुलने हैदराबाद विरुद्ध सामन्यात खूप स्लो बॅटिंग केली. याच कारणामुळे तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होतोय. केएल राहुलने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 29 धावा केल्या. यासाठी त्याने 33 चेंडू घेतले. केएल राहुलचा स्ट्राइक रेट फक्त 87.88 चा होता.

महत्त्वाच म्हणजे केएल राहुलने ही स्लो बॅटिंग पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये केली. पावरप्लेमध्ये प्लेयर रिंगणात असतात. ओपनिंगला येणाऱ्या फलंदाजांना फटकेबाजीची मोकळीक असते. राहुलच्या या बॅटिंगमुळे लखनऊच्या टीमने पावरप्लेमध्ये फक्त 27 धावा केल्या. लखनऊचा कॅप्टन असलेल्या राहुलने 10 ओव्हर बॅटिंग केली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. राहुलच्या धीम्या बॅटिंगमुळे पहिल्या 10 ओव्हरमध्ये लखनऊचा रनरेट प्रति ओव्हर 6 रन्सपेक्षापण कमी होता.

मागच्या चार सामन्यात केएल राहुलचा स्ट्राइक रेट काय?

केएल राहुलची ही बॅटिंग पाहून फॅन्सनी कॅप्टन रोहित शर्मा आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांचे आभार मानले. अशा स्लो बॅटिंगमुळेच केएल राहुलला टी 20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये स्थान मिळालेलं नाही आणि हा एकदम योग्य निर्णय आहे असं फॅन्सच मत आहे. केएल राहुलने मागच्या पाचपैकी चार सामन्यात खूप कमी स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. कोलकाता विरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट 119 होता. मुंबई विरुद्ध सुद्धा 127 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. चेन्नई विरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट 114 होता. केएल राहुल सुद्धा स्वत: अशा बॅटिंगमुळे नाराज दिसतोय. टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळू शकलं नाही, त्यामुळे सुद्धा तो निराश असेल. केएल राहुलला आपल्या स्ट्राइक रेटवर काम करावं लागेल अन्यथा लखनऊची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाऊ शकते.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.