LSG vs CSK Live Streaming : चेन्नईसाठी निर्णायक सामना, लखनौ यलो आर्मीचा जुनो हिशोब चुकता करणार?

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings IPL 2026 Live Scorecard: लखनौ सुपर जायंट्ससाठी आयपीएल 2026 स्पर्धा संपलीय. मात्र चेन्नईचा प्लेऑफसाठी संघर्ष सुरुय. त्यामुळे चेन्नईसाठी लखनौ विरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

LSG vs CSK Live Streaming : चेन्नईसाठी निर्णायक सामना, लखनौ यलो आर्मीचा जुनो हिशोब चुकता करणार?
LSG vs CSK IPL 2026
Image Credit source: Bcci
| Updated on: May 14, 2026 | 11:48 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात प्लेऑफसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या हंगामात 58 सामन्यानंतरही एकही संघ अधिकृतपणे प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. एकूण 2 संघांचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे 4 जागांसाठी 8 संघांमध्ये चुरस आहे. शुक्रवारी 19 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी 1 असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना होणार आहे. चेन्नईसमोर लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान असणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची सलग आणि एकूण दुसरी वेळ ठरणार आहे.

चेन्नई आणि लखनौ दुसऱ्यांदा आमनेसामने

चेन्नई विरुद्ध लखनौ दोन्ही संघ याआधी 10 मे रोजी आमनेसामने आले होते. तेव्हा चेन्नईने पंजाबवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. लखनौचं या पराभवासह 19 व्या मोसमातील आव्हान संपुष्ठात आलं होतं. मात्र चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. मात्र चेन्नईला प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे चेन्नई सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकणार की लखनौ 15 मे रोजी यलो आर्मीचा हिशोब चुकता करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

Follow Us