AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPL 2023 : महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत कोणता संघ आघाडीवर, अंतिम फेरीपर्यंत कशी असेल स्पर्धा जाणून घ्या

महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी सहा संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे जाणून घ्या

MPL 2023 : महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत कोणता संघ आघाडीवर, अंतिम फेरीपर्यंत कशी असेल स्पर्धा जाणून घ्या
MPL 2023 : महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा रंगतदार वळणार, कोणता संघ अव्वल स्थानी जाणून घ्या Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 20, 2023 | 5:00 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र प्रिमियर लीग 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ असून साखळी फेरीचे सामने सुरु आहेत.पुणेरी बाप्पा, ईगल नाशिक टायटन्स, कोल्हापूर टस्कर्स, छत्रपती संभाजी किंग्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स असे संघ आहेत. साखळी फेरीत प्रत्येक संघ पाच सामने खेळणार आहे. आघाडीच्या चार संघांना क्वॉलिफायर फेरीत संधी मिळणार आहे. या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. तीन पैकी तीन सामने जिंकत 6 गुण पदरात पाडले आहेत आणि 1.528 चा रनरेट आहे. तर पुणेरी बाप्पाने 3 पैकी 2 सामने जिंकत 4 गुणांची कमाई केली आहे.

ईगल नाशिक टायटन्स 6 गुणांसह अव्वल स्थानी आहे. पुणेरी बाप्पा 4 गुणांसह दुसऱ्या, रत्नागिरी जेट्स 2 गुण आणि 0.433 रनरेटसह तिसऱ्या, कोल्हापूर टस्कर्स 2 गुण आणि -1.202 रनरेटसह चौथ्या स्थानी आहेत. छत्रपती संभाजी किंग्स आणि सोलापूर रॉयल्स या संघांना दोन सामन्यात विजयाचं खातं खोलता आलं नाही. शून्य गुणांसह दोन्ही संघ अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

अशी असेल स्पर्धा

  • क्वॉलिफायर 1 फेरीचा सामना 26 जून 2023 रोजी रात्री 8.00 वाजता
  • एलिमिनेटर फेरीचा सामना 27 जून 2023 रोजी रात्री 8.00 वाजता
  • क्वॉलिफायर 2 फेरीचा सामना 28 जून 2023 रोजी रात्री 8.00 वाजता
  • अंतिम फेरीचा सामना 29 जून 2023 रोजी रात्री 8.00 वाजता

नाशिक विरुद्ध पुणे सामना

या स्पर्धेतील ईगल नाशिक टायटन्स आणि पुणेरी बाप्पा यांच्यात अतितटीचा सामना झाला. नाशिक संघाने 20 षटकात 9 गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पुणेरी बाप्पा हा संघ 20 षटकात 8 गडी गमवून 202 धावा करू शकला. हा सामना नाशिकने अवघ्या एका धावेने जिंकला. पण खऱ्या अर्थाने या सामन्यात लक्ष वेधून घेतलं ते नाशिकच्या आर्शिन कुलकर्णीने..आर्शिन कुलकर्णीने 54 चेंडूत 117 धावांची खेळी केली. यात खेळीत त्याने उत्तुंग 13 षटकार ठोकले. तसेच 3 चौकार मारले. आर्शिनच्या या खेळीने क्रीडाप्रेमींचं चांगलंच मनोरंजन झालं.

संघांचे संपूर्ण स्क्वॉड

ईगल नाशिक टायटन्सचा संपूर्ण स्क्वॉड : राहुल त्रिपाठी, सिद्धेश वीर, आशय पालकर, धनराज शिंदे, आदित्य राजहंस, आर्शिन कुलकर्णी, इझान सय्यद, रेहान खान, रिशब कारवा, रजेक फल्लाह, ओमकार अखाडे, अक्षय वायकर, प्रशांत सोलंकी, सिद्धांत दोशी, साहिल पारिख, वैभव विभुते, कौशल तांबे, हर्षद खडिवाले, रोहित हडके, वरुण देशपांडे, मंदार भंडारी, शुभम नागावडे, शर्वीन किसवे.

पुणेरी बाप्पाचा संपूर्ण स्क्वॉड : ऋतुराज गायकवाड, रोहन दामले, प्रशांत कोरे, अद्वय शिद्धये, अझहर अन्सारी, शुभंकर हार्डीकर, वैभव चौगुले, रोशन वाघसरे, पियुश साळवी, आदित्य दावरे, सौरभ दिघे, शुभम कोठारी, सोहन जामले, साइश दिघे, सचिन भोसले, अभिमन्यु जाधव, यश क्षीरसागर, पवन शाह, श्रीपाद निंबाळकर, हर्ष संघवी, दिग्विजय पाटील, अजय बोरुडे, आदर्श बोथारा, भूषण नवांडे, कुंश दीक्षित, हर्ष ओस्वाल, सुरज शिंदे.

सोलापूर रॉयल्स : विकी ओस्वाल, सत्यजीत बच्छाव, ओंकार राजपूत, हर्षवर्धन टिंगरे, सुनील यादव, यश बोरकर, प्रथमेश गावडे, प्रणय सिंग, अंश धूत, प्रतीक म्हात्रे, प्रवीण देशेटी, अथर्व काळे, यश नहार, मेहुल पटेल, यासर शेख, देव डी नाटु, अभिनव भट्ट, स्वप्नील फुलपगार, संकेत फराटे, विशांत मोरे, रुषभ राठोड.

कोल्हापूर टस्कर्स : केदार जाधव, नौशाद शेख, किर्तीराज वाडेकर, मनोज यादव, विद्या तिवारी, आत्मन पोरे, अक्षय दरेकर, श्रेयश चव्हाण, सिद्धार्थ म्हात्रे, तारांजित ढिल्लोन, निहाल तुसामद, रवि चौधरी, अंकित बावने, सचिन दास, निखिल मदास, साहिल औताडे.

छत्रपती संभाजी किंग्स : राजवर्ध हंगरगेकर, रामेश्वर दौड, आकाश जाधव, मोहसीन सय्यद, जगदीश झोपे, हितेश वाळुंज, रुषिकेश नायर, स्वराज चव्हाण, ओम भोसले, शामसुजामा काझी, आनंद ठेंगे, मुर्तुजा ट्रंकवाला, रणजित निकम, अनिकेत नलावडे, स्वप्नील चव्हाण, स्वप्नील चव्हाण, के. खाटपे, हृषिकेश दौंड, अश्विन भापकर, तनेश जैन, वरुण गुजर, अभिषेक पवार आणि सौरभ नवले.

रत्नागिरी जेट्स : अजीम काझी, विजय पवळे, दिव्यांग हिंगणेकर, अश्कान काझी, रोहित पाटील, पृथ्वीराज शिळमकर, किरण चोरमले, धीरज फटांगरे, प्रीतम पाटील, क्रिश शहापूरकर, निकित धुमाळ, प्रदीप दधे, कुणाल थोरात, स्वराज वाबळे, शाहरुख कदीर, एस. तुषार श्रीवास्तव, साहिल चुरी, अकिलेश गवळे, सौरभ शेवाळकर, रुषिकेश सोनवणे, समर्थ कदम आणि निखिल नाईक.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...